Join us

इस्तंबुलमध्ये अनीता भाभीला लुटले; वाचा पुढे काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2017 21:05 IST

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘भाभी जी घर पर हैं’मधील अनीता भाभी अर्थात सौम्या टंडन हिला एका भयंकर घटनेला सामोरे ...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘भाभी जी घर पर हैं’मधील अनीता भाभी अर्थात सौम्या टंडन हिला एका भयंकर घटनेला सामोरे जावे लागले. तिच्यासोबत ही घटना भारतात नव्हे तर विदेशात घडली आहे. काही दिवसांपूर्वी सौम्याने मालिकेतून ब्रेक घेत सुट्या एन्जॉय करण्यासाठी इस्तंबुल गाठले होते. मात्र याठिकाणी तिला वेगळ्याच घटनेचा सामना करावा लागला. वृत्तानुसार, जेव्हा ती टर्कीमध्ये सुट्या एन्जॉय करण्यासाठी पोहोचली होती, तेव्हा एका टॅक्सी ड्रायव्हरने तिच्याकडून तब्बल एक हजार यूरो लुटले. या घटनेनंतर सौम्याने तेथील पोलीस स्टेशनमध्ये अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे. सौम्याने मुंबई मिररला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, जेव्हा मी इस्तंबुलला टॅक्सीने जात होती, तेव्हा अचानकच थोड्या अंतरावर गेल्यावर टॅक्सी ड्रायव्हर माझ्यावर जोरजोरात ओरडू लागला. मला नमाजला जायचे आहे, असे तो ओरडून सांगत होता. पुढे गेल्यानंतर त्याने अचानक टॅक्सी थांबविली अन् माझ्याकडे पैसे मांगायला लागला. जेव्हा मी बारकाईने बघितले तेव्हा त्याने टॅक्सीचे मीटरही सुरू केले नव्हते. टॅक्सीत बसताना ही बाब माझ्या लक्षात आली नव्हती. तेव्हा मी टॅक्सीमधून बाहेरचा नजारा बघत होती. त्याची आरडाओरड बघून मी त्याला पैसे दिले. तर त्याने ते घेण्यास नकार दिला. त्याने म्हटले की, ‘ही चुकीची करेंसी आहे, टर्कीत केवळ यूरो आणि लीरा हे दोनच चलन चालतात.’ तेव्हा मला जाणवले की, तो यूरो मांगत आहे. जेव्हा मी त्याला पैसे देण्यासाठी पर्स काढली तेव्हा त्याने बळजबरीने पर्समध्ये हात टाकत सर्व पैसे काढून घेतले. हे करत असताना तो जोरजोरात ओरडत होता. माझे लक्ष विचलित करण्यासाठी कारचा हॉर्नही वाजवित होता. त्याचे हे तांडव बघून मी दंग झाले. जेव्हा तो तेथून निघून गेला तेव्हा मी पर्स उघडून बघितली, तर त्यामधून तब्बल एक हजार यूरोज गायब होते. त्यानंतर मी लगेचच इस्तंबुल येथे पोलीस ठाणे गाठत पोलिसांत तक्रार दिली. मात्र त्या व्यक्तीविरोधात माझ्याकडे कुठलीच माहिती नसल्याने पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. सध्या पोलीस त्याचा तपास करीत आहेत.