Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिता भाभी आमिरची फॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2016 11:23 IST

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अनिता भाभी अर्थात सौम्या टंडन हिला आमिर खानचे चित्रपट खूप आवडतात. ...

‘भाभीजी घर पर है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अनिता भाभी अर्थात सौम्या टंडन हिला आमिर खानचे चित्रपट खूप आवडतात. ती आमिरची डाय हार्ड फॅन आहे. त्याचबरोबर नसिरूद्दीन शहा आणि राणी मुखर्जी यांचा अभिनय देखील तिला खूप भावतो. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, आमिर हा एक परिपक्व अभिनेता आहे. त्याचे चित्रपट दमदार असतात. मी आमिरचे सर्व चित्रपट आवर्जून बघते. पुढे बोलताना तिने सांगितले की, ‘भाभीजी घर पर है’ ही मालिका म्हणजे तणावमुक्तीचे उत्तम माध्यम आहे. मालिकेत अंगुरी भाभी, विभुती नारायण मिश्रा, सक्सेनाजी हे पात्र लोकांचे भरभरून मनोरंजन करीत आहेत. त्यामुळे मालिकेतील चुटकुले लोकांना तणावमुक्तीपासून दूर ठेवतात. मालिकेत माझी भूमिका एका बेरोजगार असलेल्या व्यक्तीच्या पत्नीची आहे. त्यामुळे लोक मला पुरुषविरोधी विचाराची महिला असे म्हणत नसावेत अशी मला सुरुवातीला भीती वाटत होती. परंतु विनोदी मालिका असल्याने लोक याकडे मनोरंजन या एकाच हेतूने बघतात. खरं तर याविषयी बोलायचे झाल्यास, पती-पत्नी हा समान धागा आहे. जर पत्नी घराबाहेर काम करीत असेल तर हाऊस हजबण्ड बनायला काहीच हरकत नाही. खरं तर पती, पत्नी यांच्यात विभाजन करण्याची गरज नाही. त्यामुळे मालिकेकडे मनोरंजनाच्यादृष्टीनेच बघा असा सल्लाही सौम्या टंडन हिने दिला. अंगुरी भाभी या पात्राप्रमाणेच अनिता भाभीची भूमिका देखील लोकांच्या पसंतीस उतरली आहे.