Join us

Bigg Boss18 च्या प्रीमियरला आले अनिरुद्धाचार्य महाराज, सलमानला भेट दिली भगवद् गीता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 17:09 IST

सलमानसाठी मुलगी शोधण्याबद्दल म्हणाले...अभिनेत्याची प्रतिक्रिया व्हायरल

बिग बॉस १८ (Bigg Boss 18) ची आज धमाकेदार सुरुवात होणार आहे. आज रविवार रात्री ९ वाजता बिग बॉस १८ चा प्रीमियर होणार आहे. भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) होस्टिंगची सर्वांनाच उत्सुकता आहे. तसंच घरात कोणकोणते स्पर्धक जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. ग्रँड प्रीमियरचे व्हिडिओ काही दिवसांपासून व्हायरल होत आहेत. यामध्ये अध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्य (Aniruddhacharya Maharaj) हे देखील प्रीमियरला स्टेजवर दिसणार आहेत. त्यांचा सलमानसोबत एक फोटोही व्हायरल होतोय. यामध्ये ते सलमानला भगवद्गीता देताना दिसत आहेत.

'बिग बॉस तक' या व्हायरल पेजवर सलमान आणि अनिरुद्धाचार्य यांचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. अध्यात्मिक गुरु अनिरुद्धाचार्य यांनी सदस्यांना आणि बिग बॉस शोला शुभेच्छा देण्यासाठी प्रीमियरला हजेरी लावली. तसंच ते सलमानला भगवद्गीता देतानाही दिसत आहेत. हे घेताना सलमानच्या चेहऱ्यावरही हास्य आहे. त्यांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

यासोबतच अनिरुद्धाचार्यांनी सलमानची फिरकी घेत त्याच्यासाठी मुलगी शोधायचा विषय काढला. ते म्हणाले, "मी जी मुलगी शोधेल ती पळणार नाही." यावर सलमानही हसत म्हणतो, 'मला पळणारी(भगौडी)च मुलगी हवी.

अनिरुद्धाचार्य बिग बॉसमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा काही दिवसांपूर्वी झाली होती. मात्र ते घरात जाणार नाहीयेत. ते केवळ सदस्यांना आशीर्वाद देण्यासाठी पोहोचले आहेत. यावेळेस बिग बॉसमध्ये 'टाईम का तांडव' पाहायला मिळणार आहे. गुफा-युगाची थीम ठेवण्यात आली आहे.  टाईम ट्रॅवल आधारित ही थीम आहे. 

टॅग्स :बिग बॉससलमान खानटेलिव्हिजनअध्यात्मिक