अनिल करणार मराठी चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 16:59 IST
अभिनेता अनिल कपूरने हमाल दे धमाल या मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते आणि आता त्याला पुन्हा मराठीत काम करायचे ...
अनिल करणार मराठी चित्रपट
अभिनेता अनिल कपूरने हमाल दे धमाल या मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते आणि आता त्याला पुन्हा मराठीत काम करायचे आहे. १०० नव्हे तर ११० टक्के मी मराठीत काम करेन असे त्याचे म्हणणे आहे. अनिल याबाबत सीएनक्ससोबत बोलताना म्हणाला, मी चेंबूरमध्ये लहानाचा मोठा झालो आहे. त्यामुळे मराठी ही भाषा माझ्यासाठी खूप जवळची आहे. मराठी चित्रपटात मी याआधीही काम केले होते आणि आताही माझी मराठीत काम करण्याची इच्छा आहे असे तो सांगतो.