Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अनिल थत्तेना आली कुटुंबीयांची आठवण !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 17:13 IST

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामधील रहिवाशी संघामध्ये अनिल थत्ते सध्या बरेच चर्चेमध्ये आहेत. मग ती त्यांची वेशभूषा असो वा ...

कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामधील रहिवाशी संघामध्ये अनिल थत्ते सध्या बरेच चर्चेमध्ये आहेत. मग ती त्यांची वेशभूषा असो वा कपडे असो वा त्यांची फटकन बोलण्याची पद्धत असो. घरातील काही सदस्यांना त्यांचे वागणे खटकते, तर काही आक्षेप व्यक्त करतात तर काही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. घरातील सदस्यांबरोबर त्यांचे रोजचं खटके उडत असतात. अनिल थत्ते यांना घरातील सदस्यांची बरीच बोलणी देखील वारंवार खावी लागतात. पण अतिशय धूर्त पणे त्या सगळ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून जेंव्हा त्याना वाटते तेंव्हाच ते उत्तर देतात. आरती सोलंकी रविवारी झालेल्या भागामध्ये घराबाहेर पडली आणि त्यामुळे मेघा धाडे हिने अनिल थत्ते यांना बरेच सुनावले. पहिल्या दिवसापसुन अनिल थत्ते आणि घरच्यांमध्ये होणारा वाद, त्यांच्या मधील भांडण हे काही प्रेक्षकांसाठी नवीन नाही. घरामध्ये होणारी भांडण, होणारे वाद हे सोडता काही सदस्य अनिल थत्ते यांच्याशी वयाचा मान ठेवून बोलतात देखील पण खरोखरच त्यांना अनिल थत्ते यांचे वागणे, बोलणे पटते कि, त्यांच्या डोक्यामध्ये काही वेगळे सुरु आहे, हि गोष्ट वेळ आली कि कळेल.  शनि – रवी झालेल्या भागामध्ये देखील उषा नाडकर्णी, रेशम टिपणीस यांनी अनिल थत्ते यांना बऱ्याच गोष्टी ऐकावल्या. उषाजींनी त्यांना एक सरळ प्रश्न विचारला, माझ्याबद्दल माहिती नसताना असे वेडेवाकडे बोलण्याचा अधिकार यांना कोणी दिला ? रेशमने देखील अनिल थत्ते यांच्याविषयी नाराजगी व्यक्त करत तिची मत परखडपणे व्यक्त केली. यावरूनच अनिल थत्ते आणि स्मिता यांच्यामध्ये झालेल्या चर्चेमध्ये अनिल थत्ते यांनी परखडपणे त्यांना काय वाटते सांगितले. आणि या एलिमनेशन मुळे अनिल थत्ते यांच्याविरोधात घरातील बरीच मंडळी असणार आहेत अशी कल्पना स्मिताने अनिल थत्ते यांना दिली.  घरामध्ये होणाऱ्या या सगळ्या गोष्टींचा परिणाम अनिल थत्ते यांच्यावर झाला. त्यांनी त्यांच्या मनात असलेल्या काही गोष्टी व्यक्त देखील केल्या. या घरामध्ये कसे ते लोकांची बोलणी ऐकून घेतात, सगळं सहन करतात. या घरामध्ये आपल्या परिवारापासून दूर असताना त्यांची आठवण येणे हे खूपच स्वाभाविक आहे. पण हे सगळं करत असताना त्यांना त्यांच्या बायकोची आणि घराची आठवण आली, आणि त्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना हे अवघ्या सात दिवसातच कळाले कि, ते त्यांनी त्यांच्या घरच्यांवर अन्याय केला...