‘अंगुरी भाभी’ दिसणार कपिलच्या शोमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 09:31 IST
‘भाभी जी घर पें है’ या सर्वाधिक लोकप्रीय मालिकेतील सर्वाधिक लोकप्रीय कॅरेक्टर म्हणजे अंगुरी भाभी अर्थात शिल्पा शिंदे. अंगुरी ...
‘अंगुरी भाभी’ दिसणार कपिलच्या शोमध्ये
‘भाभी जी घर पें है’ या सर्वाधिक लोकप्रीय मालिकेतील सर्वाधिक लोकप्रीय कॅरेक्टर म्हणजे अंगुरी भाभी अर्थात शिल्पा शिंदे. अंगुरी भाभी शो सोडणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. यामागचे खरे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. पण सूत्रांनी दिलेली बातमी मानाल तर, अंगुरी भाभी म्हणजेच शिल्पा कपिलच्या ‘दी कपिल शर्मा शो’मध्ये सामील झाली आहे.लवकरच शिल्पा कपिलच्या शोमध्ये एका खास भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, कपिलच्या शोमध्ये शिल्पा पिंकी बुवाची जागा घेऊ शकते. अर्थात या कॅरेक्टरचे नाव काहीसे वेगळे असेल. शिल्पा कपिलची वहीणी अर्थात भाभी बनणार असल्याचीही खबर आहे. तेव्हा बघूया !!!