Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंगद हसिजा झळकणार ढाई किलो प्रेममध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2017 13:54 IST

अंगद हसिजाने सपना बाबुल का... बिदाई या मालिकेपासून त्याच्या करियरला सुरुवात केली. या मालिकेत त्याने एका गतीमंद मुलाची भूमिका ...

अंगद हसिजाने सपना बाबुल का... बिदाई या मालिकेपासून त्याच्या करियरला सुरुवात केली. या मालिकेत त्याने एका गतीमंद मुलाची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. त्यानंतर तो राम मिलाये जोडी, सावित्री यांसासारख्या मालिकांमध्ये काम केले होते. सध्या तो वारिस या मालिकेत झळकत आहे. या मालिकेतील त्याच्या भूमिकेलादेखील प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. अंगदच्या फॅन्ससाठी एक चांगली बातमी आहे. तो आता एका मालिकेत झळकणार असून या मालिकेत त्याची छोटीशी पण महत्त्वाची भूमिका असणार आहे. तो ढाई किलो प्रेम या मालिकेत काम करणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना दीपिका आणि पियूष यांची प्रेमकथा पाहायला मिळत आहे. या मालिकेची कथा ही सध्याच्या इतर मालिकांपेक्षा खूपच वेगळी आहे. सध्या सगळ्याच मालिकांमध्ये प्रेक्षकांना सडपातळ, ग्लॅमरस अभिनेत्री आणि सिक्स पॅक्स अॅब्स असलेला अभिनेते पाहायला मिळतात. पण  या मालिकेतील नायक-नायिका हे दोघेही जाडजूड आहेत. त्यामुळे त्यांची प्रेमकथा ही आगळीवेगळी असून ती प्रेक्षकांना प्रचंड भावत आहे. या मालिकेत आता प्रेक्षकांचा लाडका अंगद हसीजा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार आहे. पियूष आणि दीपिका यांच्या प्रेमकथेला एक वेगळे वळण देण्यासाठी अंगदची एंट्री होणार आहे. पियूषला जवळवण्यासाठी दीपिका अंगदची मदत घेणार आहे. यातून दीपिकाविषयीच्या प्रेमाची पियूषला जाणीव होणार आहे. या मालिकेत कोणत्याही पाहुण्या कलाकाराने हजेरी लावण्याची पहिली वेळ नाहीये. यापूर्वी किश्वर मर्चंट, अली गोनीसारखे प्रसिद्ध कलाकार या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकले होते.