ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमात सध्या चिमुकले स्पर्धक विविध नृत्य सादर करताना आपल्याला दिसत आहेत. प्रेक्षकांना या चिमुरड्यांचे हे नृत्य खूपच आवडत आहे. या चिमुकल्यांमध्ये आता कोण विजेता ठरणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. या कार्यक्रमात जितेंद्र जोशी, फुलवा खामकर, शकुंतला नगरकर परीक्षकांच्या भूमिकेत आहेत. या सगळ्यांकडून स्पर्धकांना अमूल्य असे अनेक टिप्स मिळत आहेत. या कार्यक्रमातील चिमुकल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दर आठवड्याला वेगवेगळे कलाकार येत असतात. या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख याने देखील हजेरी लावली होती. आता ढोलकीच्या तालावरच्या सेटवर आणखी काही प्रसिद्ध कलाकार पाहायला मिळणार आहेत.
कलर्स मराठी या वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी मॅड या कार्यक्रमाचा दुसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केले होते. या कार्यक्रमात अमृता खानविलकर, संजय जाधव आणि उमेश जाधव परीक्षकाच्या भूमिकेत होते. या कार्यक्रमातदेखील अतिशय सुंदर परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. याच कार्यक्रमातील अमृता आणि उमेश जाधव यांनी नुकतीच ढोलकीच्या तालावरच्या सेटला भेट दिली होती.
अमृता खालविलकर ही स्वतः एक खूप चांगली डान्सर आहे. वाजले की बारा या गाण्यावर तर तिने अफतालून नृत्य सादर केले आहे. तसेच नच बलिये या कार्यक्रमाची देखील ती विजेती ठरली आहे तर उमेश जाधव यांनी मराठी चित्रपटसृष्टीप्रमाणेच हिंदी चित्रपटसृष्टीतदेखील आपले नाव कमावले आहे. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांची कोरिओग्राफी केली आहे. या दोघांनी ढोलकीच्या तालावरच्या सेटवर जाऊन चिमुकल्या स्पर्धकांचे नुकतेच कौतुक केले.
Also Read : ढोलकीच्या तालावरमुळे जितेंद्र जोशीच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये वाढ
अमृता खानविलकर आणि उमेश जाधव यांनी दिली ढोलकीच्या तालावरच्या सेटला भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 17:09 IST