छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या जॉनरच्या मालिका प्रसारीत होत असतात आणि या मालिकेतील विविध भूमिका रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत असतात. ऑरमॅक्स मीडियाच्या रिपोर्टनुसार, छोट्या पडद्यावर फिक्शन मालिकेत हिंदीत तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील जेठालाल आणि मराठीत आई कुठे काय करतेयमधील अरुंधती यांनी लोकप्रियतेत बाजी मारली आहे. तर नॉन फिक्शनमध्ये द कपिल शर्मा शोमधील कपिल शर्मा आणि मराठीमध्ये चला हवा येऊ द्या या शोमधील भाऊ कदमने बाजी मारली आहे.
ऑरमॅक्स कॅरेक्टर्स इंडिया लव्हज भारतातील प्रादेशिक भाषेतील वाहिन्यांवरील लोकप्रिय पात्रांचा आढावा घेण्याचे काम करते. यात तमीळ, तेलगू, बांगला, हिंदी आणि मराठीचा समावेश आहे. ही एजेंसी २०१० सालापासून सर्व प्रादेशिक वाहिन्यांचा आढावा घेत आहे. ऑरमॅक्स कॅरेक्टर्स इंडिया लव्हजने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार हिंदीत तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील जेठालाल आणि मराठीत आई कुठे काय करतेयमधील अरुंधती हे पात्र हिट ठरले आहे. तर शोजमध्ये द कपिल शर्मा शोमधील कपिल शर्मा आणि मराठीमध्ये चला हवा येऊ द्या या शोमधील भाऊ कदम लोकप्रिय ठरले आहेत.