Join us
Daily Top 2Weekly Top 5

अम्माजवळ परतला नवाब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2016 10:18 IST

कविता कौशिकसह ब्रेकअप झाल्यानंतर नवाब शाहने 'अम्मा 'मालिकेतूनही ब्रेक घेतला होता. आता तो पुन्हा अम्मा मालिकेत परतला आहे. गँगस्टर ...

कविता कौशिकसह ब्रेकअप झाल्यानंतर नवाब शाहने 'अम्मा 'मालिकेतूनही ब्रेक घेतला होता. आता तो पुन्हा अम्मा मालिकेत परतला आहे. गँगस्टर हैदर काजीच्या भूमिकेत तो झळकणार आहे. याविषयी बोलतांना नवाबने सांगितले की,या मालिकेच्या शूटिंगला खूप मिस करत होतो. कारण ही मालिका मला खूप जवळची वाटते. त्यामुळे जास्त दिवस मालिकेपासून दूर राहणे कठीण जात असल्यामुळे पुन्हा एकदा मालिकेत एंट्री करण्याचा निर्णय घेतला. त्यात शबाना आझमी यांच्याबरोबर काम करण्याचा एक वेगळाच आनंद मिळत असल्याचे त्याने म्हटले आहे. एक माँ जो लाखो के लिए बनी अम्मा मालिका 25 जूनला सुरू झाली. दोन लेकरांची आई असलेल्या झीनतची कहानीव आधारित ही मालिका आहे.फक्त 75 भागांची असलेली या मालिका अल्पावधीतच रसिकांच्या कौतुकास पात्र ठरली.हैदराबादमध्ये या मालिकेचं शूटिंग होतं.मालिकेच्या सुरूवातीला उर्वशी शर्मा अम्माची भूमिका साकारत होती.मात्र काही कारणामुळे तिने या मालिकेतून एक्झिट घेतली. उर्वशीच्या जागी शबाणा आझमी आता अम्माची भूमिका साकारत आहेत. ही मालिका एक सिनेमा वाटावा अशा स्वरूपात असल्यामुळे रसिकांकडूनही या मालिकेला भरभरून पसंती मिळतेय. मालिकेत  येणा-या भागात अनेक ट्विस्ट अँड टर्न पाहायला मिळतील.