Join us
Daily Top 2Weekly Top 5

कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी उषा उथुपसोबत गायले गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 15:57 IST

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनचा सर्वात मोठा रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती ९' नुकताच सुरू झाला असून या सिझनला देखील प्रेक्षकांचा ...

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनचा सर्वात मोठा रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती ९' नुकताच सुरू झाला असून या सिझनला देखील प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमात नुकतेच आपल्याला अभिषेक बच्चनला पाहायला मिळाले होते आणि त्यानंतर आता आगामी भागात प्रेक्षकांना एक प्रसिद्ध गायिका दिसणार आहे. ही गायिका एका स्पर्धकाचे मनोबल वाढवण्यासाठी कार्यक्रमात येणार आहे.कौन बनेगा करोडपतीच्या आगामी भागात प्रेक्षकांना गौरी सावंतला पाहायला मिळणार आहे. गौरी हॉट सीटवर बसून कौन बनेगा करोडपती हा खेळ खेळणार आहे. गौरी सावंत ही एक ट्रान्स जेंडर असून तिने ‘नानी का घर 'नावाची स्वतःची एक संघटना उघडली आहे. तिने एक मुलगी सुद्धा दत्तक घेतली आहे आणि तिला ती चांगले शिक्षण देखील देणार आहे. या तिच्या कामगिरीमुळे गौरी सावंत चांगलीच फेमस आहे.प्रसिद्ध गायिका उषा उथुप गौरी सावंतला पाठिंबा दर्शवण्यासाठी या कार्यक्रमात आल्या होत्या. त्यांनी आपली फेमस गाणी गाऊन या कार्यक्रमात एंट्री मारली. त्यांचे गाणे ऐकून उपस्थित सगळेच खूश झाले होते. अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांना साथ दिली. अमिताभ बच्चन आणि उषा उथुप यांनी देखा ना हाय रे सोचा ना आणि एकला चलो रे यांसारखी गाणी गात स्पर्धकांना आणि प्रेक्षकांना ताल धरायला लावला. अमिताभ बच्चन यांचे फॅन्स तर हा भाग पाहून खूपच खूश होतील अशी या कार्यक्रमाच्या टीमला खात्री आहे. या कार्यक्रमाच्या टीममधील काही मंडळींनी दिलेल्या माहितीनुसार कार्यक्रमाच्या सेटवर खूपच चांगले वातावरण होते. अमिताभ बच्चन आणि उषा उथुप यांच्या गाण्यांना उपस्थितांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या नुसार उषा उथुप आणि अमिताभ बच्चन यांना एकत्र गाताना पाहाण्याचा एक वेगळाच आनंद होता. उषा उथुप यांच्या गायनाचा अमिताभ बच्चन प्रचंड आनंद घेत होते. त्यांनी दोघांनीही प्रेक्षकांचे मनोरंजन केले. सेटवर संगीतमय वातावरण निर्माण झाले होते.Also Read : कौन बनेगा करोडपती ९ मध्ये अमिताभ बच्चन यांनी उडवली अभिषेक बच्चनची टर