Join us
Daily Top 2Weekly Top 5

​अमिताभ बच्चन चक्रव्यूह मालिकेत दिसणार या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2017 14:53 IST

अमिताभ बच्चन यांनी मोठ्या पड्याप्रमाणेच छोट्या पडद्यावरही त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. कौन बनेगा करोडपती हा त्यांचा कार्यक्रम ...

अमिताभ बच्चन यांनी मोठ्या पड्याप्रमाणेच छोट्या पडद्यावरही त्यांचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. कौन बनेगा करोडपती हा त्यांचा कार्यक्रम प्रचंड गाजला होता. या कार्यक्रमाचे अनेक सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आले होते. नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटील आलेल्या क्या कसूर है अमला का या मालिकेतील एक खास अभियानात देखील त्यांनी एक महत्त्वाची भूमिका साकारली होती आणि आता आणखी एका मालिकेच्या टीमसोबत ते काम करणार आहेत.चक्रव्यूह या मालिकेची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. या मालिकेच्या कथेचे ते वर्णन करणार असल्याचे कळतेय. या मालिकेत ते अभिनय करणार नसूत ते आपला आवाज या मालिकेला देणार आहेत. या मालिकेला त्यांनी आवाज द्यावा यासाठी या मालिकेच्या निर्मात्यांनी त्यांना संपर्क साधला आहे. अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांना आवाज दिला आहे.  अमिताभ बच्चन चक्रव्यूह या कार्यक्रमासोबत जोडले जात असल्याने या मालिकेच्या टीमला प्रचंड आनंद होत आहे.चक्रव्यूह या मालिकेत नारायणी शास्त्री, संगीता घोष, महिमा मकवाणी आणि प्रणित भट्ट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या मालिकेत नारायणी शास्त्री सत्रुपा ही भूमिका साकारणार असून ती राजमाता असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर महिमा मकवाणा अनामी ही भूमिका साकारणार आहे. ती आपल्या सावत्र पालकांचा अतिशय आदर करते. तसेच ती एक आनंदी, खेळकर मुलगी आहे असे दाखवण्यात येणार आहे. पण या 17 वर्षांच्या मुलीला तिच्या आयुष्यातील काही रहस्य कळल्यामुळे तिचे संपूर्ण आयुष्यच बदलणार आहे. तर देस में निकला होगा चाँद फेम संगीता घोष या मालिकेत सुधा ही भूमिका साकारणार आहे. सुधा या भूमिकेला नकारात्मक छटा असून या भूमिकेमुळे कथानकाला अनेक वळणे मिळणार आहेत. Also Read : संगीता घोष का चिडली आहे चक्रव्यूहच्या निर्मात्यांवर?