Join us  

KBC 14: रामायणाशी संबंधित 'या' प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही; स्पर्धकाला गमवावी लागली मोठी रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2022 5:41 PM

१२ लाख ५० हजारांच्या टप्प्यावर असताना विचारला होता प्रश्न

Amitabh Bachchan KBC 14: अमिताभ बच्चन यांचा रिअँलिटी शो 'कौन बनेगा करोडपती' सीझन १४ (Kaun Banega Crorepati 14) हा सध्या चर्चेत असणारा शो आहे. या शो चा सध्या चौदावा सीझन सुरू असून हा सीझन सुरू झाल्यापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. या शो च्या प्रत्येक भागाबरोबर चाहत्यांना नवनवीन गोष्टी समजतात आणि त्यांची उत्सुकताही सतत वाढत असते. चौदाव्या सीझनमध्ये शो ऑन एअर झाल्यापासून, या सीझनमध्ये आतापर्यंत एकही स्पर्धक करोडपती झालेला नसला तरी, स्पर्धकांनी लाखोंची बक्षिसं जिंकली आहेत. याच दरम्यान, अलीकडे शो मधील एका महिला स्पर्धकाला रामायणाशी संबंधित एका प्रश्नाचे उत्तर न देता आल्याने मोठ्या रकमेवर पाणी सोडावं लागले.

व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेली यशस्वी सक्सेना फास्टेस्ट फिंगर फर्स्टचे उत्तर देऊन हॉट सीटवर प्रथम आली. यशस्वीने ८० हजार रुपयांच्या प्रश्नाचं चुकीचं उत्तर दिलं आणि त्यामुळे ती फक्त १० हजार रुपये घेऊन परतली. यशस्वीच्या जागी मग रूची पुवर (Ruchi Puwar) खेळ खेळण्यासाठी बसल्या. शो च्या सुरुवातीपासूनच रूची या अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या बहुतांश प्रश्नांची बरोबर उत्तरे देत होत्या. त्यांनी काही लाइफ लाइनचा देखील वापर केला होता.

नक्की काय होता प्रश्न...

त्यानंतर अमिताभ यांनी रूची यांना रामायणशी संबंधित एक प्रश्न विचारला. 'कौन बनेगा करोडपती'मध्ये अमिताभ बच्चन यांनी रूची यांना १२ लाख ५० हजारांचा प्रश्न विचारला. "यापैकी कोणती गोष्ट वाल्मिकी रामायणातील एक भाग (कांड) नाही? पर्याय देण्यात आले होते... A- सुंदरकांड B- वनवास कांड C- युद्ध कांड आणि D- किष्किंधा कांड. या प्रश्नाचे उत्तर रूची यांना माहिती नव्हते. त्यामुळे प्रश्न १२ लाख ५० हजारांचा होता, पण त्यांच्या सर्व लाइफलाइन संपल्या होत्या. त्यामुळे त्यांना धोका पत्करायचा नसल्याने त्यांनी नाईलाजाने शो सोडणं फायद्याचं समजलं आणि Quit केलं. या प्रश्नाचे अचूक उत्तर म्हणजे वनवास कांड हे होते. पण रूची यांना माहिती नसल्याने त्यांनी ६ लाख ४० हजारांचे बक्षिस जिंकले.

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चनरामायणटेलिव्हिजन