Join us

KBC 17: १ कोटी रुपयांचा प्रश्न, तुम्हाला उत्तर माहित आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 14:49 IST

तो कोणता प्रश्न आणि त्याचे उत्तर काय?

सामान्य माणसाला एका खेळातून करोडपती होण्याचं स्वप्न दाखवणारा आणि त्यासाठी संधी देणारा कार्यक्रम 'कौन बनेगा करोडपती' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ११ ऑगस्टपासून 'कोण होणार करोडपती'चं नवं १७ वं पर्व (Kaun Banega Crorepati 17) सुरू झालं आहे. यंदाही या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अभिनेते अमिताभ बच्चन करत आहेत. कौन बनेगा करोडपतीच्या १७ व्या पर्वात कशिश सिंघल या एक कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहोचणाऱ्या पहिल्या स्पर्धक ठरल्या. मात्र त्यांना एक कोटी रुपयांसाठीच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. त्यामुळे त्यांनी ५० लाखांचे बक्षीस घेऊन खेळ तिथेच सोडला. आता इंटरनेटवर एक कोटीच्या या प्रश्नाची चर्चा होत आहे. तो कोणता प्रश्न होता आणि त्याचे उत्तर काय होते? ते पाहू.

'केबीसी १७'मध्ये एक खास प्रसंग घडला. कशिश सिंघल या हॉट सीटवर बसल्या होत्या. त्तम खेळ खेळत, प्रश्नांची बरोबर उत्तरे देत कशिश सिंघल या एक कोटीच्या प्रश्नापर्यंत पोहचल्या.  पण या कोटीच्या प्रश्नाचं उत्तर चुकल्याने त्यांचं मोठं नुकसान झालं. त्यांचं या पर्वाची पहिली करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

एक कोटींचा प्रश्न काय होता?

  •  प्रश्न: व्हिसिगॉथच्या कोणत्या राजाने शहरावरील वेढा उठवण्यासाठी प्राचीन रोमकडून काळी मिरी खंडणी म्हणून मागितली होती, ज्याचा रोम भारतासोबत व्यापार करत असे? 
  • पर्याय:  A) लुडोविक, B) एमेरिक, C) अलारिक और D) थियोडोरिक

 या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय C म्हणजे 'अलारिक' आहे. 

जेव्हा अलारिकनं रोमवर वेढा घातला होता, तेव्हा त्याने तो वेढा उठवण्यासाठी प्रचंड खंडणी मागितली. त्या खंडणीत सोनं, चांदी, रेशीम, मौल्यवान कातडी आणि साधारण 3,००० पौंड काळी मिरी (black pepper) यांचा समावेश होता. काळी मिरी त्या काळात विलासी आणि महागड्या वस्तूंमध्ये गणली जायची.  रोमकडून तिचा भारताशी दीर्घकालीन व्यापार चालू होता. त्यामुळे ही मागणी विशेष ऐतिहासिक ठरते. प्राचीन काळापासून, मिरपूड हा नेहमीच जगातील सर्वात महत्वाचा मसाला राहिला आहे. 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चन