Join us

महिलांमध्ये जास्त लोकप्रिय कोण होतं? अमिताभ बच्चन-जावेद अख्तर यांनी दिलं हे उत्तर, फरहान हसतच राहिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 11:31 IST

बिग बी आणि जावेद अख्तर केबीसी १७ मध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी हा मजेदार किस्सा घडला

ज्येष्ठ गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासोबत 'कौन बनेगा करोडपती' (KBC 17) च्या आगामी एपिसोडमध्ये सहभागी झालेले दिसले. या एपिसोडच्या प्रोमोमध्ये हा मजेशीर किस्सा समोर आला आहे, जिथे जावेद अख्तर आणि त्यांचा मुलगा फरहान अख्तरने  (Farhan Akhtar) हजेरी लावली होती. त्यावेळी काय घडलं जाणून घ्या?

महिलांमध्ये कोण जास्त लोकप्रिय?

हा एपिसोड अमिताभ बच्चन यांच्या ११ ऑक्टोबर रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त शूट करण्यात आला आहे. प्रोमोमध्ये, फरहान अख्तरने अमिताभ बच्चन आणि जावेद अख्तर यांना विचारलं की, दोघांपैकी महिलांमध्ये जास्त लोकप्रिय कोण होतं? या प्रश्नावर जावेद अख्तर थोडेसे अडखळले, पण अमिताभ बच्चन यांनी तात्काळ जावेद अख्तर यांच्याकडे इशारा केला आणि हसून म्हणाले की, तेच महिलांमध्ये जास्त लोकप्रिय होते.

यानंतर, अमिताभ बच्चन यांनी जावेद अख्तर यांच्याशी संबंधित एक खास सीक्रेट गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि म्हणाले, "मी तुम्हाला सांगू की..." अमिताभ असं म्हणताच जावेद यांनी त्यांना मध्येच थांबवलं आणि विनंती करत म्हटलं, "माझ्याबद्दल सगळं काही सांगू नका!" यावर सगळेजण हसू लागले. जावेद अख्तर आणि बिग बी या मित्रांमधला हा संवाद ऐकायला सर्वांना मजा आली.

फरहानच्या दिग्दर्शनावर बिग बींची प्रतिक्रिया

याशिवाय, अमिताभ बच्चन यांनी फरहान अख्तर यांच्या दिग्दर्शनाखाली 'लक्ष्य' (Lakshya) चित्रपटात काम करण्याचा अनुभवही शेअर केला. बिग बी म्हणाले की, फरहान रात्री त्यांच्या रूममध्ये आला आणि त्याने विचारलं, "अमिताभ अंकल, तुम्हाला काही अडचण आहे का?" तेव्हा मला पहिल्यांदा असं जाणवलं की, मी एक नवीन अभिनेता आहे आणि समोर 'उस्ताद' बसलेला आहे, जो मला ॲक्टिंग कशी करायची हे सांगत आहे. यावर सर्वांना खूप हसू आलं. फरहान सुद्धा तोंडावर हात ठेऊन हसत होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Amitabh Bachchan and Javed Akhtar reveal who's more popular with women.

Web Summary : On KBC, Farhan asked Amitabh and Javed who is more popular with women. Amitabh pointed to Javed, ready to reveal secrets, but Javed stopped him, creating a funny moment.
टॅग्स :कौन बनेगा करोडपतीअमिताभ बच्चनजावेद अख्तरफरहान अख्तर