Join us

अमिताभ यांनी दिल्या अनिलला शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 15:33 IST

अनिल कपूरचा 24 हा कार्यक्रम काहीच दिवसांत सुरू होणार आहे. 24 या कार्यक्रमाचा पहिला सिझन खूपच गाजला होता. त्यामुळे ...

अनिल कपूरचा 24 हा कार्यक्रम काहीच दिवसांत सुरू होणार आहे. 24 या कार्यक्रमाचा पहिला सिझन खूपच गाजला होता. त्यामुळे या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सिझनची चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो प्रदर्शित झाल्यापासून या कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता आहे. त्याचसोबत बिग बी अमिताभ बच्चनही या कार्यक्रमाच्या प्रोमोवर फिदा झाले आहेत. त्यांनी हा प्रोमो पाहिल्यानंतर 24 या कार्यक्रमाचा प्रोमो खूपच चांगला आहे असे ट्वीट केले आहे. त्याचसोबत अनिल कपूर आणि सिकंदर खेर यांना या कार्यक्रमासाठी त्यांनी ट्विटरद्वारे खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच हा कार्यक्रम लोकांनी आवर्जून पाहावा असेदेखील त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.