Join us

अमितने रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:45 IST

अमित टंडन इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात एक स्पर्धक म्हणून प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या कार्यक्रमाचे त्याला विजेतेपद ...

अमित टंडन इंडियन आयडॉल या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात एक स्पर्धक म्हणून प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता. या कार्यक्रमाचे त्याला विजेतेपद पटकवता आले नसले तरी या कार्यक्रमाचा त्याला चांगलाच फायदा झाला. या कार्यक्रमानंतर त्याने साँस भी कभी बहू थी या मालिकेत काम केले. तसेच कैसा ये प्यार है, दिल मिल गये, जिनी और जूजू, ये है मोहोब्बते यांसारख्या मालिकेत त्याने प्रमुख भूमिका साकारल्या आणि आता दिल देके देखो या मालिकेत तो काम करत आहे. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे या मालिकेत काम करण्यासोबतच या मालिकेचे टायटल साँगदेखील त्यानेच गायले आहे. कोणत्याही अभिनेत्याने आपल्या मालिकेचे टायटल साँग गाण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अमित खूपच खूश आहे. तो सांगतो, "या मालिकेचे टायटल साँग मीच गायले असल्याने टायटल साँगमध्ये अभिनय करताना मला खूप मजा आली. माझ्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने मी लोकांपर्यंत पोहोचवू शकलो असे मला वाटते."