अलीने रचले गीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 11:39 IST
अली फजल त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान अलीने सगळ्यांनाच एक सुखद धक्का ...
अलीने रचले गीत
अली फजल त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान अलीने सगळ्यांनाच एक सुखद धक्का दिला. या कार्यक्रमात त्याने एक गाणे गायले. हे गाणे खूपच छान होते. हे गाणे ऐकल्यावर त्याच्या आगामी चित्रपटातील हे गाणे असावे असेच सगळ्यांना वाटत होते. पण हे गाणे आणि या गाण्याची धुन ही कोणत्याही चित्रपटातील अथवा अल्बममधील नसून मला आता नुकतीच सुचली असल्याचे त्याने सांगितल्यावर सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. द कपिल शर्मा शोमुळे अलीमधील एक चांगला गुण प्रेक्षकांच्या नक्कीच समोर आला.