Join us
Daily Top 2Weekly Top 5

"गुलाबी साडी" गाण्यावर मराठमोळ्या अभिनेत्रीचा फॅमिलीसह भन्नाट डान्स, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 16:34 IST

माधुरी दीक्षितपासून ते अदा शर्मापर्यंत अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर थिरकताना दिसले. मराठी सेलिब्रिटींनीही 'गुलाबी साडी' गाण्यावर रील बनवले आहेत.

सोशल मीडियावर अनेक गाणी ट्रेंडिंग होत असतात. सध्या 'गुलाबी साडी' हे गाणं ट्रेंडमध्ये आहे. या गाण्यावरील अनेक रील व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अनेक सेलिब्रिटींनाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. माधुरी दीक्षितपासून ते अदा शर्मापर्यंत अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर थिरकताना दिसले. मराठी सेलिब्रिटींनीही 'गुलाबी साडी' गाण्यावर रील बनवले आहेत. आता अभिनेत्री अक्षया नाईकला या गाण्याची भुरळ पडली आहे. 

अक्षयाने तिच्या कुटुंबीयांसह गुलाबी साडी या गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत अक्षया गुलाबी साडी गाण्यावर कुटुंबीयांसह डान्स करताना दिसत आहे. या गाण्याच्या हुक स्टेप करत त्यांनी गुलाबी साडी गाण्यावर रील बनवला आहे. अक्षयाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

'सुंदरा मनामध्ये भरली' या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अक्षयाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मराठीबरोबरच अक्षयाने हिंदी मालिकांमध्येही अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अक्षयाची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

टॅग्स :अक्षया नाईकटिव्ही कलाकार