Join us

​‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या प्रोमोची अक्षय कुमारने अशी केली होती तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 17:44 IST

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमाचा पाचवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अभिनेता ...

‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमाचा पाचवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अभिनेता अक्षयकुमार हा सुपरजज म्हणजेच बॉस म्हणून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘देशातील पहिलाच गर्भवती पुरुष’ असे शीर्षक असलेला द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा प्रोमो पाहाताच सगळ्यांचा भुवया उंचावल्या होत्या. या प्रोमोची चांगलीच चर्चा झाली. हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रोमोची पटकथा आणि संकल्पना ही खूपच वेगळी होती. या मालिकेच्या निर्मात्यांशी निकटचा संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, “अक्षयकुमार हा केवळ दिलेले काम करायचे आणि चित्रीकरण संपल्यावर घरी जायचे, अशा प्रकारचा कलाकार नाहीये. तो सर्जनशील आणि नावीन्यपूर्ण कल्पना सुचविणारा आणि आपली विशिष्ट छाप सोडणारा अभिनेता आहे. त्याने केलेल्या सूचना या क्षेत्राच्या त्याच्या आजवरच्या अनुभवावर आधारित असतात आणि एखाद्या प्रसंगावरील अक्षयची भूमिका त्या स्पष्ट करतात. ‘विनोदवीरांना जन्म देण्यासाठी गर्भवती राहिलेला पुरुष’ अशी प्रोमाची संकल्पना आहे असे अक्षयला कार्यक्रमाच्या टीमने सांगताच तो भलताच खूश झाला. त्याने लगेचच या प्रोमोच्या टीमसोबत एक मिटिंग केली आणि या प्रोमोत आपला अभिनय कसा असेल. गर्भवती पुरुषाला भूक लागल्यावर तो काय करेल, अपत्याला जन्म देताना त्याला वाटणारी धाकधूक तसंच पत्नीबरोबर सोनोग्राफी चाचणीसाठी जातानाची त्याची मन:स्थिती यांसारख्या अनेक बाबींची त्याने तपशीलवार चर्चा केली. त्याने या प्रोमोसाठी जे योगदान दिले आहे, ते या प्रोमोत निश्चितपणे जाणवत आहे.”या कार्यक्रमात झाकीर खान, मल्लिका दुआ हे लोकप्रिय विनोदवीर तसेच लेखक हुसेन दलाल परीक्षकाची भूमिका बजावणार आहेत.Also Read : ऐकलेत का अक्षय कुमार आहे गरोदर