एली अवरामने वाढवली अक्षय कुमारची डोकेदुखी... अक्षयच्या मदतीला आला मनीष पॉल !
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 16:58 IST
अक्षय कुमार वेळेच्या बाबतीत शिस्तप्रिय आहे अशी त्याची इंडस्ट्रीमध्ये ओळख आहे. मात्र अनेक वर्षानंतर शूटिंगच्या पहिल्याच दिवशी अक्षय कुमार ...
एली अवरामने वाढवली अक्षय कुमारची डोकेदुखी... अक्षयच्या मदतीला आला मनीष पॉल !
अक्षय कुमार वेळेच्या बाबतीत शिस्तप्रिय आहे अशी त्याची इंडस्ट्रीमध्ये ओळख आहे. मात्र अनेक वर्षानंतर शूटिंगच्या पहिल्याच दिवशी अक्षय कुमार थकला आणि लवकर घरी गेला. आम्ही बोलतो आहोत द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज सीझन 9 बाबत. या शोमध्ये अक्षय कुमार सुपर जजच्या भूमिकेत दिसणार आहेत. शो च्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी अक्षयवर बोर होऊन घरी जायची वेळ का आली असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर त्याच उत्तर आहे शो ची अँकर एली अबराम एली अवराम याची शो ची अँकर आहे. एलीची हिंदी किती चांगली आहे हे आपल्या सगळ्यांच माहिती आहे. झाले असे की पहिल्याच दिवसाच्या शूटिंग वेळी एमीने इतके रिटेक्स घेतले की अक्षय कुमार चांगलाच वैतागला. एली हिंदीतल्या मोठ्या लाईन्स बोलताना अडखळत होती. त्यानंतर अक्षयने वैतागून मेकर्सना स्पष्ट शब्दात सांगितले की माझ्या सीन्सची शूटिंग आधी करण्यात यावी आणि एलीच्या एँकर लिंक्सचा शूटिंगनंतर करण्यात यावी. आता अशी माहिती मिळते आहे की एलीसोबत आता शोमध्ये एक कॉ होस्टसुद्धा दिसणार आहे. मेकर्सची पहिली चॉईस सुनील ग्रोवर आहे तर दुसरी मनीष पॉल. जर मेकर्सने या शोमध्ये मनीष पॉलला कॉ होस्टिंसाठी घेतले तर ते एलीसाठी सोपे जाईल. याआधी एलीने मनीषसोबत मिकी वायरसमध्ये सुद्धा काम केले आहे. अक्षय कुमार एलीच्या हिंदी कंटाळल्या असल्याच्या बातम्या आधी ही वारंवार आल्या होत्या. मात्र आता मेकर्सच शोमध्ये कॉ होस्ट आणणार या बातमीवरुन ही न्यूज कंफर्म झाली आहे की अक्षय एलीला खरंच वैतागला आहे. ALSO READ : जाणून घ्या अक्षय कुमारच्या आयुष्यातील सगळ्यात आवडती व्यक्ती कोण?अक्षयचा टॉयलेट एक प्रेमकथा बॉक्स ऑफिसवर अजूनही बिझेनस करताना दिसतोय. गेल्या पाच वर्षातील अक्षयचे सगळे रेकॉर्ड या चित्रपटांने तोडले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटाच्या सेटवरचे फोटो व्हायरल झाले होते. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2018 ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.