Join us

अशाप्रकारे 'छोटी मालकीण'च्या सेटवर अक्षर कोठारीची इच्छा झाली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 06:30 IST

'छोटी मालकीण' या मालिकेत श्रीधरची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षर कोठारीने सेटवर सहकलाकारांसमोर आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली आणि त्याची ही इच्छा दुसऱ्या दिवशी पूर्ण देखील झाली.

ठळक मुद्दे अक्षर कोठारीला खूप आवडते पिठले मालिकांचा सेट हे आम्हा कलाकारांसाठी दुसरे घर - अक्षर कोठारी

स्टार प्रवाहच्या 'छोटी मालकीण' या मालिकेत श्रीधरची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षर कोठारीने सेटवर सहकलाकारांसमोर आपल्या मनातील इच्छा व्यक्त केली आणि त्याची ही इच्छा दुसऱ्या दिवशी पूर्ण देखील झाली. कोणती इच्छा त्याने व्यक्त केली हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल.  

अक्षर कोठारीला पिठले खूप आवडते. त्याने त्याची आवड सेटवर सांगताच दुसऱ्याच दिवशी पिठले भाकरीचा खास बेत आखण्यात आला.  मालिकेत अक्षरच्या आईची भूमिका साकारणाऱ्या वंदना वाकनीस यांनी अक्षरसाठी खास पिठले बनवून आणले. तर मालिकेचा प्रोडक्शन मॅनेजर विशाल मोरेनेही अक्षरसाठी पिठले आणून त्याला खास सरप्राइज दिले. या अनोख्या मेजवानीने अक्षर खूपच भावूक झाला होता.'मालिकांचा सेट हे आम्हा कलाकारांसाठी दुसरे घर असते आणि सहकलाकार म्हणजे कुटुंब. दिवसातला बराच वेळ सेटवर जात असल्यामुळे अशा आनंदाच्या क्षणांची आम्ही वाट पाहत असतो. सेटवरच्या याच छोट्या मोठ्या गोष्टी नवा हुरुप देत असतात. स्टार प्रवाह आणि प्रोडक्शन हाऊस आम्हा कलाकारांची मनापासून काळजी घेतात. म्हणूनच तर पडद्यामागे दिसणारी केमिस्ट्री सीनमधूनही खुलून येते.' असे मत अक्षर कोठारीने व्यक्त केले.'छोटी मालकीण' या मालिकेत अक्षरबरोबर एताशा संझगिरी दिसणार आहे. एताशा 'रेवती' ही प्रमुख व्यक्तिरेखा साकारत आहे. एताशाची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेत ती डॉ. गिरीश ओक, वंदना वाकनीस, अक्षर कोठारी, निखिलराजे शिर्के, प्रदीप पंडित, प्रतीक्षा जाधव, पूजा नायक अशा अनुभवी कलाकारांबरोबर दिसणार आहे.