सोशल मीडियावर रोज नवीन गाणी ट्रेंडमध्ये असतात. या गाण्यांवरचे अनेक रील्सही व्हायरल होत असतात. लोकप्रिय अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या ट्रेंडिंग गाण्यावर कायमच रील बनवताना दिसतात. पती अविनाश नारकर यांच्यासह त्या ठेका धरतात. पण आता मात्र ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या दोन सहकलाकार मैत्रिणींसोबत रील व्हिडीओ बनवला आहे. ऐश्वर्या यांनी सुरुची अडारकर आणि तितिक्षा तावडे यांच्यासोबत ट्रेंडिंग गाण्यावर ठेका धरला आहे.
ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या नारकर, तितिक्षा तावडे आणि सुरुची अडारकर "गणाबाई मोगरा, गणाची साडी..." या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. एकमेकींना साथ देत या तिघींनीही छान डान्स केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहतेही खूश झाले आहेत. ऐश्वर्या यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
ऐश्वर्या-सुरुची-तितिक्षा या तिघींनी मिळून साड्यांचा नवा ब्रँड सुरू केला आहे. 'थ्रेड अँड ठुमका' असं त्यांच्या ब्रँडचं नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच त्या तिघींनी व्यवसायात पाऊल टाकत हा नवा ब्रँड सुरू केला. त्याला चाहत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अनेक ठिकाणी प्रदर्शनामध्ये त्या साड्यांचे स्टॉल्सही लावतात. सोशल मीडियावरुन त्या चाहत्यांना अपडेट देत असतात.
Web Summary : Aishwarya Narkar, along with Suruchi Adarkar and Titiksha Tawde, created a reel on the trending song 'Ganabai Mogra, Ganachi Sadi'. The video, shared on Instagram, shows the trio dancing in sync, delighting fans. They also run a saree brand together.
Web Summary : ऐश्वर्या नारकर ने सुरुचि अदारकर और तितिक्षा तावड़े के साथ ट्रेंडिंग गाने 'गनाबाई मोगरा, गनाची साड़ी' पर रील बनाई। इंस्टाग्राम पर साझा किए गए वीडियो में तीनों ताल मिलाते हुए नृत्य कर रही हैं, जिससे प्रशंसक खुश हैं। वे एक साथ साड़ी ब्रांड भी चलाती हैं।