आयुषमान खुरानाला लिप सिंग बॅटल या कार्यक्रमाच्या सेटवर झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 15:11 IST
लिप सिंग बॅटल या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम पाश्चिमात्य देशात प्रचंड प्रसिद्ध असून याचे भारतीय ...
आयुषमान खुरानाला लिप सिंग बॅटल या कार्यक्रमाच्या सेटवर झाला अपघात
लिप सिंग बॅटल या कार्यक्रमाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. हा कार्यक्रम पाश्चिमात्य देशात प्रचंड प्रसिद्ध असून याचे भारतीय व्हर्जन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाची सर्वेसर्वा फराह खान असून अली असगर तिला या कार्यक्रमात साथ देणार आहे. या कार्यक्रमासाठी नुकतेच आयुषमान खुराणाने चित्रीकरण केले. पण या चित्रीकरणादरम्यान आयुष्यमानला एक छोटासा अपघात झाला. लिप सिंग बॅटल या कार्यक्रमात प्रेक्षकांना लवकरच रवीना टंडनला पाहायला मिळणार आहे. रवीना या कार्यक्रमात अनिल कपूरच्या गेटअप मध्ये दिसणार आहे. तिच्यासोबतच या कार्यक्रमात आयुषमान खुराणा हजेरी लावणार आहे. रवीना आणि आयुषमानमध्ये स्पर्धा रंगणार आहे. रवीना अनिल कपूरच्या मेरा नाम है लखन या गाण्यावर तर आयुषमान गोविंदाच्या मेरी पँट भी सेक्सी, मेरी शर्ट भी सेक्सी या गाण्यावर नृत्य करणार आहे. दुलारा या चित्रपटातील गोविंदाचे हे गाणे चांगलेच गाजले होते. आयुषमान या नृत्यासाठी पाणीपुरीवाला बनणार आहे. या भागासाठी आयुषमानने नुकतेच चित्रीकरण केले. आयुषमानला लिप सिंग बॅटलमधील त्याचा परफॉर्मन्स सर्वोत्तम असावा असे वाटत असल्याने दृश्य चित्रीत करण्याआधी तो नृत्याची तालीम करत होता. पण या तालमीच्या वेळी एक अपघात घडला. डान्सची तालीम करण्यासाठी सेटवर पाणीपुरीचा थैला देखील लावण्यात आला होता. पण पाणीपुरीसाठी बनवण्यात आलेले सगळे पाणी स्टेजवर सांडले आणि त्यातील काही पाणी आयुषमानच्या डोळ्यात देखील गेले. हे पाणी म्हणजे केवळ रंगाचे पाणी असावे असे आयुषमानला वाटले होते. पण हे पाणीपुरीसाठी वापरण्यात येणारे तिखट पाणी होते. त्यामुळे त्याला चांगलाच त्रास झाला. तो जोराजोरात ओरडायला लागला. कार्यक्रमाच्या टीमने पाहिले तर त्याचा संपूर्ण डोळाच लाल झाला होता. त्यामुळे लगेचच कार्यक्रमाच्या टीमने डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी त्याच्या डोळ्यात काही ड्रॉप्स टाकले. त्यामुळे एक तास तरी चित्रीकरण थांबवावे लागले. आयुषमान हा गोविंदाचा खूप मोठा फॅन असल्याने तो परफॉर्मन्स झाल्यानंतर आयुषमानला सरप्राईज द्यायाला स्टेजवर येणार होता. गोविंदा आला आहे हे आयुषमानला कळू नये यासाठी तो बँकस्टेज थांबला होता. आयुषमानच्या या अपघातानंतर तो चित्रीकरण करू शकेल की नाही हा सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण काहीच वेळात आयुषमानने पुन्हा चित्रीकरण करायला सुरुवात केली. त्यान खूप चांगला परफॉर्मन्स सादर केला आणि त्यानंतर गोविंदाने येऊन त्याला सरप्राईज दिले. Also Read : रवीना टंडनचा नवा अवतार तुम्ही पाहिला आहे का?