Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अग्गंबाई सासूबाई'मध्ये आसावरी अनुभवतेय तिच्या पहिल्या कमाईचा आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 21:33 IST

अग्गंबाई सासूबाई ही मालिका रंजक वळणावर आली आहे.

गेल्या वर्षभरापासून अग्गंबाई सासूबाई ही मालिका सातत्याने प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. कथानकात दरवेळी येणाऱ्या नवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी ठरते आहे. सध्या ही मालिका रंजक वळणावर आली आहे. पत्नीच्या प्रेमापोटी अभिजीत राजेंनी त्यांच्या संपत्तीवर पाणी सोडून ते चाळीत रहायला आले आहेत. दरम्यान अभिजीत राजे आणि आसावरी यांनी अन्नापूर्णा नामक छोटेसे हॉटेल सुरू केले आहे.

अग्गंबाई सासूबाई मालिकेत एकीकडे आसावरी आणि अभिजीत राजे चाळीत रमलेले असतात आणि अभिजीत राजे रस्त्यावरील पावभाजीच्या दुसऱ्याच्या ठेल्यावर काम करत असतात. तिथल्या मालकाने मसाल्यात भेसळ केल्यामुळे एका लहान मुलाला त्रास होऊ लागतो आणि तो बेशुद्ध पडतो. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागते. आपल्यामुळे लहान मुलाचा जीव धोक्यात आला, असे अभिजीत राजेंना वाटत असते. त्यामुळे पुर्णपणे कोलमडून जातात. तो मुलगा बरा होतो. पण तरीदेखील अभिजीत राजे अस्वस्थ असतात. त्यानंतर आसावरी आणि अभिजीत दोघेही अन्नापूर्णा सांभाळायचे ठरवितात.

अग्गंबाई, सासूबाई मालिकेच्या आगामी भागात, अभिजित राजे आणि आसावरी यांनी सुरु केलेल्या अन्नपूर्णामध्ये अनेकजण तिथल्या रुचकर अन्नाचा आस्वाद घेत आहेत. अभिजीत आणि आसावरी त्यांच्या व्यवसायाचा पहिला दिवस असल्याने त्यासाठी पैसे घेण्याचा आग्रह करतात. त्यांचा मान ठेवत अभिजीत आणि आसावरी ते पैसे घेतात. आसावरीने केलेली ही आयुष्यातील पहिली कमाई आहे आणि हा आनंद ती अभिजित राजे यांच्यासोबत शेअर करते.

अग्गंबाई, सासूबाईमध्ये पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी याचे प्रीमियर भाग झी ५ क्लबवर पाहता येतील.

टॅग्स :अग्गंबाई सासूबाईझी मराठी