Join us
Daily Top 2Weekly Top 5

'काजू'च्या जन्मानंतर भारती सिंगला वाटतेय गोलूची चिंता, छोट्या भावाला आईजवळ पाहून दिली होती अशी रिअ‍ॅक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 15:37 IST

Bharti Singh : लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंग नुकतीच दुसऱ्यांदा आई झाली आहे. दुसऱ्या मुलाला जन्म दिल्यानंतर भारती आता हॉस्पिटलमधून घरी परतली आहे. भारती आणि हर्ष त्यांच्या धाकट्या मुलाला प्रेमाने 'काजू' नावाने हाक मारत आहेत.

लोकप्रिय कॉमेडियन भारती सिंगने १९ डिसेंबर रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला. भारती आणि बाळ दोघेही सुखरूप असून आता ते घरी परतले आहेत. भारती हॉस्पिटलमध्ये असतानाही व्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना सर्व अपडेट्स देत होती. नुकत्याच शेअर केलेल्या एका व्लॉगमध्ये भारतीने तिचा मोठा मुलगा गोलाबद्दलची तिची काळजी व्यक्त केली आहे. भारतीने सांगितले की, जेव्हा गोलाने 'काजू'ला आईच्या जवळ पाहिले, तेव्हा त्याला ते फारसे आवडले नव्हते.

भारती सिंग व्लॉगच्या माध्यमातून तिच्या दोन्ही मुलांचे अपडेट्स देत असते. अलीकडेच तिने 'काजू'ची एक झलक चाहत्यांना दाखवली. तिने बाळाचा चेहरा अद्याप दाखवलेला नाही, पण मागच्या बाजूने त्याला दाखवत बाळ निरोगी आणि गोंडस असल्याचे सांगितले. गोलाची देखील त्याच्या धाकट्या भावाशी भेट झाली असून, त्याला पाहून गोला खूप आनंदी झाला होता. विशेष म्हणजे, 'काजू' हे नाव स्वतः गोलानेच ठेवले आहे.

भारतीला वाटतेय गोलाची काळजीआपल्या लेटेस्ट व्लॉगमध्ये गोला बद्दल बोलताना भारती भावुक झाली. ती म्हणाली, "जेव्हा मी काजूला फीड करत होते, तेव्हा गोलाने अचानक पाहिले आणि कदाचित त्याला ते आवडले नाही. 'मम्मा हे का करत आहे? मम्मा तू अशी...' त्याचे ते बघणे पाहून मला खूप वाईट वाटले. मला याच गोष्टीची भीती वाटत होती की, जेव्हा गोला मला काजूच्या इतक्या जवळ बघेल, तेव्हा मी त्याला कसे सांभाळणार? माझ्यासाठी तर दोन्ही मुले माझ्या डोळ्यांसारखी आहेत. एका डोळ्याला जरी काही झाले तरी मला त्रास होईल. मला गोलाला कधीच असे वाटू द्यायचे नाही की त्याला कमी प्रेम मिळत आहे."

भारतीने पुढे सांगितले, "आम्ही आता गोलाचे थोडे जास्त लाड करत आहोत जेणेकरून तो काजूवर खूप प्रेम करेल. जे आधीपासून आहे. आज जेव्हा नर्स काजूला घेऊन जात होती, तेव्हा गोला म्हणाला, 'आमच्या बाळाला सोडा, हे आमचं बाळ आहे, हा माझा भाऊ आहे.' मला नेहमी असेच वाटते की त्यांच्यात असेच प्रेम राहावे आणि गोलाने त्याला केवळ भाऊ नाही तर स्वतःच्या मुलासारखे मानावे." 

English
हिंदी सारांश
Web Title : Bharti Singh Worries About Gola After 'Kaju' is Born

Web Summary : Bharti Singh is concerned about her elder son Gola's reaction to his younger brother 'Kaju'. She fears Gola might feel neglected and is trying to shower him with extra love and attention to ensure a strong sibling bond.
टॅग्स :भारती सिंग