Join us  

"डोळेच देतायेत साक्ष", झोमॅटो बॉयला आणखी एका अभिनेत्रीचा फुल्ल सपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 7:48 PM

Zomato Delivery Boy: परिणीती चोप्राने देखील त्याची बाजु घेतली होती. त्याला मदत कशी करु शकते. यावर तिने झोमॅटो इंडियाला ट्विटही केले होते. कृपया या प्रकरणातील सत्य शोधून काढा आणि आलेला रिपोर्ट सार्वजनिक करा.

झोमॅटोचा एक डिलिव्हरी बॉय आणि बेंगळुरूतील एका महिलेने केलेले त्याच्यावरचे आरोप सध्या चर्चेत आहेत.ऑर्डर रद्द केल्यामुळे झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने आपल्या नाकावर बुक्का मारला या हल्ल्यात महिलेच्या नाकाला जबर मार लागला आणि तिच्या नाकातून रक्त येऊ लागले, असा दावा त्या महिलेने केला होता. मात्र आरोपानंतर  त्या डिलिव्हरी बॉयने वेगळीच आपबीती सांगितली होती. मी नाही तर त्या महिलेनेच मला मारहाण केली होती, असा उलट आरोप त्याने केला होता. जेव्हा मी पार्सल घेऊन या महिलेच्या घरी पोहोचलो तेव्हा थोडा उशिर झाला होता. मी त्यांची त्यासाठी माफी मागितली. रस्ता खराब आणि वाहतूक कोंडीमुळे पोहोचण्यास उशिर झाला, असे सांगितले. मी दोन वर्षांपासून काम करत आहे, अशा प्रकरच्या घटनेला पहिल्यांदाच तोंड देत आहे, असे कामराज म्हणाला.

टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीनेदेखील झोमाटो डिलीव्हरी बॉय निर्दोष असल्याचे सांगत त्याला पाठिंबा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून बेंगळुरूमध्ये घडलेल्या घटनेचा सर्वच स्थरांतून निषेध करण्यात येत आहे. झोमॅटो डिलेव्हरी बॉय म्हणून काम करणारा कामराजची चूक नसून हितेशाचीच चूक असल्याचे सर्वचजण सांगत आहेत.  

सध्या सोशल मीडियावरही नेटीझन्स डिलिव्हरी बॉय कामराजचे समर्थन करत आहेत. तो निर्दोष आहे. घडलेल्या प्रकारावर तिव्र संतापही व्यक्त केला जात आहे. काही दिसांपूर्वीच कामराजची चूक नसल्याचे सांगत परिणीती चोप्राने देखील त्याची बाजु घेतली होती. त्याला मदत कशी करु शकते. यावर तिने झोमॅटो इंडियाला ट्विटही केले होते. कृपया या प्रकरणातील सत्य शोधून काढा आणि आलेला रिपोर्ट सार्वजनिक करा. जर तो व्यक्ती निर्दोष असेल तर त्या महिलेविरोधात कारवाई करण्यासाठी मदत करा. हा प्रकार अमानविय आहे. तो व्यक्ती निर्दोष असल्याची मला पुर्ण खात्री आहे. 

परिणीती पाठोपाठ रोहित रॉयनेदेखील त्याचे समर्थन केले होते. आता  काम्या पंजाबीने देखील ट्विट करत कामराजला सपोर्ट केले आहे. कामराज निर्दोष असून दोष हितेशा चंद्रानी नावाच्या महिलेचाच असल्याचे स्पष्ट आहे. काम्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की,कामराजच्या डोळेच सारे काही बोलून जात आहे. तो निर्दोष आहे. त्याला लवकरात लवकर न्याय मिळावा कामराजला नोकरीवरुन काढू नका #ZomatoDeliveryGuy टॅगकरत झोमॅटोलाच विनंती केली आहे. 

टॅग्स :काम्या पंजाबीझोमॅटो