Join us
Daily Top 2Weekly Top 5

देबिना बॅनर्जीनंतर 'बालिका वधू' फेम Neha Marda लग्नाच्या १० वर्षांनंतर होणार आई, बेबी बम्प फ्लॉन्ट करत म्हणाली..

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 13:20 IST

नेहाने त्याचा बेबी बम्प फ्लॉन्ट करत चाहत्यांसोबत ही गुडन्युज शेअर केली आहे. सेलिब्रेटीसह चाहते सध्या अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Neha Marda Pregnancy: अभिनेत्री देबिना बॅनर्जी अलीकडेच दुसऱ्यांदा आई झाली आहे. देबिनाने आपल्या लेकीची झलकही सोशल मीडियावर दाखवली आहे. देबिनानंतर आणखी एक टीव्ही अभिनेत्री आई होणार आहे. तिने सोशल मीडियावर बेबी बम्प फ्लॉन्ट करतानाचा फोटो शेअर केला आहे. ही अभिनेत्री आहे नेहा मर्दा 

नेहा मर्दा ही छोट्या पडद्यावरील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने 'डोली अरमानो की', 'बालिका वधू', 'क्यों रिश्तों में कट्टी बट्टी' आणि 'पिया अलबेला' यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. लग्नाच्या 10 वर्षांनंतर ही अभिनेत्री आई होणार आहे. नेहाने फोटो शेअर करत प्रेग्नंन्सीची बातमी दिली आहे.

नेहा मर्दाने 24 नोव्हेंबर 2022 रोजी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पती आयुष्मान अग्रवालसोबत तिच्या मेटर्निटी फोटोशूटचा फोटो शेअर केला. फोटोमध्ये हे कपल खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने लाल साटनचा ड्रेस घातला आहे आणि तिचा बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. 

फोटो शेअर करताना नेहा मर्दाने कॅप्शनमध्ये लिहिले की, '' बाळ लवकरच येत आहे, 2023." नेहा मर्दाचे चाहते तिच्या प्रेग्नेन्सीची बातमी वाचून आनंदी झाले आहेत. श्रेनू पारीखपासून अनिता हसनंदानीपर्यंत नेहा मर्दाचे अभिनंदन केले आहे. 

नेहा मर्दाने 10 फेब्रुवारी 2012 रोजी पाटण्यात राहणाऱ्या आयुष्मान खुराना या बिझनेसमनशी लग्न केले. लग्नानंतर अभिनेत्रीने काही काळ कामातून ब्रेक घेतला होता. मात्र, नंतर तिने पुन्हा कामाला सुरुवात केली.   

टॅग्स :टिव्ही कलाकारप्रेग्नंसी