अभिनेत्री शिल्पा शिंदेने २०१६ मध्ये 'भाबीजी घर पर हैं' या मालिकेला निरोप दिला होता. ९ वर्षांनंतर पुन्हा एकदा ती या शोमध्ये परतली असून तिने जुन्या गुपितावरून पडदा उचलला आहे. जेव्हा या मालिकेची सुरुवात झाली होती, तेव्हा शिल्पा शिंदेनेच 'अंगूरी भाभी'ची भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा शिल्पा 'अंगूरी भाभी' बनून छोट्या पडद्यावर परतली आहे.
'मिड-डे'शी बोलताना शिल्पा शिंदे म्हणाली, "चॅनेलच्या काही लोकांनी माझ्या भूमिकेचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता. माझ्यावर कराराचा भंग केल्याचा आरोप लावण्यात आला होता." याबद्दल अभिनेत्री म्हणाली, "त्यावेळी आमची मालिका सोडून इतर सर्व मालिका फ्लॉप होते. त्यामुळे या लोकांना आमच्या मालिकेवर नियंत्रण मिळवायचे होते. या लोकांनी माझ्या माध्यमातून चॅनेलला लोकप्रियता मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मला टीव्ही अवॉर्ड सोहळ्यांमध्ये सुद्धा माझ्या भूमिकेच्या कॉश्च्युममध्ये पाठवले. चॅनेल असो किंवा इतर अधिकारी, त्यांना फक्त माझ्यावर नियंत्रण ठेवायचे होते."
शिल्पा शिंदे म्हणाली...मालिका सोडण्याचे मुख्य कारण सांगताना शिल्पा शिंदे म्हणाली, "मालिकेला एक वर्ष सर्वकाही देऊनही मला पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले होते. अनेक गैरसमज निर्माण झाले होते. या अनुभवाकडे मी एका धड्यासारखे पाहिले, ज्याने मला लोकांचा खरा स्वभाव दाखवला. सह-कलाकारांबाबत माझी कोणतीही तक्रार नव्हती. मी दुसऱ्या मालिकेसाठी ही मालिका सोडली असे दावे केले जात होते, पण कोणालाच खरं काय ते माहित नव्हतं."
शिल्पाने मालिका सोडल्यानंतर शुभांगी अत्रे हिने तिची जागा घेतली होती. गेली ९ वर्षे शुभांगीने 'अंगूरी भाभी'ची भूमिका साकारली. मात्र, आता पुन्हा एकदा शिल्पा शिंदेने शुभांगी अत्रेची जागा घेतली आहे. शिल्पाच्या या पुनरागमनामुळे तिचे चाहते प्रचंड उत्साहात दिसत आहेत.
Web Summary : Shilpa Shinde returns to 'Bhabiji Ghar Par Hain' after 9 years, revealing exploitation attempts. She claims channel figures aimed to control her role and gain popularity through her. Misunderstandings and neglect led to her exit despite her dedication.
Web Summary : शिल्पा शिंदे 9 साल बाद 'भाबीजी घर पर हैं' में लौटीं, शोषण के प्रयासों का खुलासा किया। उन्होंने दावा किया कि चैनल के लोगों का लक्ष्य उनकी भूमिका को नियंत्रित करना और उनके माध्यम से लोकप्रियता हासिल करना था। गलतफहमी और उपेक्षा के कारण उन्हें छोड़ना पड़ा।