Join us  

'रमा राघव'मध्ये होणार अद्वैत दादरकरची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 3:42 PM

Rama raghav: रमा आणि राघव यांच्या नात्यात एक नवं वादळ येणार आहे

कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन ठेपली आहे. रमा आणि राघव यांच्या नात्यात सध्या अनेक चढउतार येत आहे. यामध्येच रमा आणि राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहित मनावर दगड ठेऊन त्या दोघांनाही वनवासाला पाठवायचा निर्णय घेतात. त्यामुळे या मालिकेत पुन्हा एक नवं वळण येणार असल्याचं दिसून येत आहे. यामध्येच आता या मालिकेत अभिनेता अद्वैत दादरकरची एन्ट्री होणार आहे.

रमा आणि राघव यांच्या वनवासामुळे त्यांच्या नात्यात एक नवं वादळ येणार आहे. या दोघांच्या नात्यात विक्रम या नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे. अद्वैत दादरकर, विक्रमची भूमिका साकारत आहे. राघव मृत्युच्या दारात उभा असताना हॉस्पिटलपासून विक्रम, रमाला सातत्याने सुचकपणे भेटत आहे. यामध्येच रमा-राघव वनवासाला निघत असतांनाच तो अचानकपणे त्यांच्यासमोर येतो.विशेष म्हणजे त्याच्या येण्याचा आणि रमा-राघवचा एक संबंध आहे. त्याचा भूतकाळ आणि रमा-राघव यांचा वर्तमान काळ यांचा परस्परांशी कसा संबंध आहे हे मालिकेत पुढे पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, आता विक्रमच्या येण्यामुळे रमा-राघवच्या आयुष्यात कोणतं नवं वादळ येणार हे मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळणार आहे. रमा राघव या मालिकेतील हा नवा ट्विस्ट ६ मे सोमवारी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेता