गंगा मालिकेच्या सेटवर आदिती शर्माच्या साडीला लागली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 16:31 IST
चित्रीकरणादरम्यान अपघात होणे यात काही नवीन नाही. अनेक सेटवर चित्रीकरणादरम्यान काही ना काही घटना घडतच असतात. नुकत्याच गंगा या ...
गंगा मालिकेच्या सेटवर आदिती शर्माच्या साडीला लागली आग
चित्रीकरणादरम्यान अपघात होणे यात काही नवीन नाही. अनेक सेटवर चित्रीकरणादरम्यान काही ना काही घटना घडतच असतात. नुकत्याच गंगा या मालिकेच्या सेटवर एक अपघात झाला. मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या गंगाच्या म्हणजेच आदिती शर्माच्या साडीला आग लागली. एका दृश्याचे चित्रीकरण करत असताना एका दिव्यामुळे तिच्या साडीला आग लागली. काय करायचे हे काही क्षण तिला कळलेच नव्हते. महाशिवरात्री पुजेच्या दिवशी गंगा शंकराची पूजा करते अशा दृश्याचे चित्रीकरण सुरू असताना हा अपघात घडला. या दृश्यासाठी संपूर्ण मंदिर दिव्यांनी सजवले होते. आणि एका दिव्याच्या खूपच जवळ आदिती उभी होती. त्याचवेळी तिच्या साडीला आग लागली. यामुळे काही वेळासाठी सेटवर खूपच तंग वातावरण निर्माण झाले होते आणि त्यामुळे चित्रीकरणदेखील थांबवण्यात आले. चित्रीकरणादरम्यान आग लागल्यानंतर लगेचच प्रोडक्शन टीममधील लोकांनी क्षणात ती आग विझवली. त्यामुळे आदितीला किंवा या टीममधील कोणालाही दुखापत झाली नाही. याविषयी आदिती सांगते, "देवाच्या कृपेने मी वाचलो असेच मी म्हणेन. इतका मोठा अपघात होऊनही मला कोणतीही दुखापत झाली नाही. आम्ही पूजेचे चित्रीकरण करत असताना अचानक माझ्या पदराला आग लागली. मी अभिनय करण्यात व्यग्र असल्याने ही गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. या घटनेनंतर चित्रीकरणाच्यावेळी सतर्क राहाण्याची गरज असते ही गोष्ट मी शिकले. आमच्या दिग्दर्शकांच्या ही गोष्ट लगेचच लक्षात आली आणि प्रोडक्शन टीममधील लोक माझ्या मदतीसाठी धावून आले. आमच्या सेटवर सेफ्टी एक्विपमेंट असल्याने आम्हाला कोणालाही कसलीही दुखापत झाली नाही.