Join us
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काराच्या आरोपात अडकलेल्या या अभिनेत्याच्या पत्नी आणि बहिणीने प्रतिक्रिया देण्यास दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 13:29 IST

बेहद ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेत पियूष सहदेव ...

बेहद ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या होत्या. या मालिकेत पियूष सहदेव एका मुख्य भूमिकेत दिसला होता. त्याच्या या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. पियूष सध्या चांगल्याच अडचणीत अडकला आहे. पियूषला पोलिसांनी काही दिवसांपूर्वी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. एका मॉडेलने पियूषवर बलात्काराचा आरोप लावला आहे. या मॉडेलने त्याच्या विरोधात मुंबईतील वर्सोवा येथील पोलिस स्टेशनमध्ये केस देखील दाखल केली आली. या मॉडेलच्या तक्रारीनंतर पियूषला पोलिसांनी अटक देखील केली असून तो गेल्या काही दिवसांपासून पोलिस कस्टडीमध्ये आहे.  
पियूषला अटक करण्यात आल्यानंतर त्याची मेडिकल चाचणी करण्यात आली होती. या मेडिकल चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याची जोरदार चर्चा आहे. पियूष आणि या मॉडेलची ओळख काही दिवसांपूर्वी एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. ही मॉडेल २३ वर्षांची असून लग्नाचे आमिष दाखवून पियूषने तिच्यावर बलात्कार केला असल्याचे तिने म्हटले आहे. पियूषने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. पण पियूषचा जामिनाचा अर्ज न्यायालयाने नाकारला असून तो सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये आहे. 
पियूषची बहीण ही प्रसिद्ध अभिनेत्री असून ती तिच्या भावाच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहील असे सगळ्यांना वाटले होते. पण तिने यावर प्रतिक्रिया देणेच टाळले आहे. बजरंगी भाईजान या चित्रपटात मुन्नीच्या आईच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री मेहर वीज ही पियूषची बहीण आहे. एका वर्तमानपत्राशी बोलताना तिने सांगितले आहे की, सध्या माझा आणि माझ्या भावाचा काहीच संपर्क नाहाये. त्यामुळे मला या प्रकरणाबद्दल काहीच माहीत नाहीये. 
पियूषचे लग्न झाले असून सध्या तो आणि त्याची पत्नी वेगळी राहात आहे. त्याच्या पत्नीदेखील या प्रकरणावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. पियूषने याआधी देवों के देव महादेव या मालिकेत रामाची भूमिका साकारली होती. तसेच सपने सुहाने लडकपन के या मालिकेत देखील तो मुख्य भूमिकेत झळकला होता. 

Also Read : ​बेहदनंतर आता या मालिकेत दिसणार कुशल टंडन