Join us

एकेकाळी या अभिनेत्रीला लोक म्हणायचे कमी खा, स्क्रीनवर वाटतेस जाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 19:36 IST

ही अभिनेत्री लवकरच मराठी चित्रपटसृष्टीत करणार आहे पदार्पण

अभिनेत्री तेजस्वी प्रकाशखतरों के खिलाडी 10मध्ये पहायला मिळते आहे. या शोमध्ये तिचा बबली अंदाज आणि बिनधास्तपणा प्रेक्षकांना भावतो आहे. सध्या लॉकडाउनमुळे हा शो प्रसारीत होत नाही आहे. एकेकाळी तेजस्वीला लोक कमी खा, जाडी होशील.

स्पॉटबॉयशी बोलताना तेजस्वी प्रकाशने सांगितले की, माझ्या गालांमुळे मी थोडी यंग दिसते. मात्र या गालांनी मला खूप त्रास दिला आहे. जेव्हा आम्ही टेलिव्हिजनवर शूट करतो तेव्हा एक्सप्रेशनवर जास्त फोकस केले जाते. त्यावेळी कॅमेरा झूम केल्यामुळे फेस मोठा दिसतो. मी बारीक आहे. पण माझ्या गालांमुळे मी कॅमेऱ्यात चबी दिसते. तुम्हाला विश्वास बसणार नाही, एक वेळ असा आला होता जेव्हा लोक मला तुम्ही थोडे कमी खा, जाडी वाटते आहे स्क्रीनवर. त्यावेळी मी विचार करायची की अजून किती बारीक होऊ.

तेजस्वीने पुढे सांगितले की, इतर सेलिब्रेटींसारखे जे स्कीन रुटीन फॉलो करतात तसे मी स्कीनसाठी जास्त काही करत नाही. आता जेव्हा मी घरी आहे आणि कुठेच जात नाही तर माझ्या स्कीनमध्ये खूप बदल झाला आहे. खूप हेल्दी आहे. मला वाटते योग्य डाएट व खूप पाणी पिणे फायदेशीर आहे.

तेजस्वी प्रकाश टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती संस्कार, स्वरागिनी, पहरेदार पिया की, रिश्ता लिखेंगे हम नया, सिलसिला बदलते रिश्तों, कर्ण संगिनीसारख्या मालिकेत झळकली आहे. तिने तिच्या अभिनयाच्या कारकीर्दीची सुरूवात मालिका 2612 मधून केली होती. सध्या ती कलर्स वाहिनीवरील रिएलिटी शो खतरों के खिलाडीमध्ये स्टंट करताना पहायला मिळते आहे.

तेजस्वी रोहित शेट्टीची निर्मिती असलेला मराठी चित्रपट स्कूल कॉलेज आणि लाइफमध्ये ती दिसणार आहे. ती या चित्रपटातून मराठी सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करते आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :तेजस्वी प्रकाशखतरों के खिलाडी