नेहमी वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मयूरी वाघ (Mayuri Wagh) आता पुन्हा एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांचा भेटीला येत आहे. यावेळी मयूरी वाघ एक वेगळी व्यक्तिरेखा साकारत आहे, ती म्हणजे एकवीरा आईची व्यक्तिरेखा! मयुरी वाघच्या या नव्या मालिकेचं नाव आहे 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई'. ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
नेहमी भक्तांच्या पाठीशी असणारी आई एकवीरा, भक्तांना त्यांचा संकटातून कशी तारून नेईल, हे पाहणं उत्सुकतेचं असेल. 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' हे या नव्या मालिकेचे नाव असून सोनी मराठी वाहिनी ही मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. या मालिकेचा पहिला प्रोमो प्रेक्षकांचा भेटीला आला असून त्यात एकवीरा आईच्या वेषातील मयूरी वाघ प्रेक्षकांना पाहायला मिळते आहे.
सोनी मराठी विविध कार्यक्रमांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करते. त्यामध्ये आता अजून एका मालिकेची भर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मयूरी वाघ आई एकवीराची भूमिका कशा प्रकारे निभावते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मयूरीव्यतिरिक्त या मालिकेत अमृता पवारही छोट्या पडद्यावर परत दिसणार आहे. 'आशीर्वाद तुझा एकवीरा आई' ही नवीन मालिका लवकरच सोनी मराठी वाहिनीवर दाखल होणार आहे.