अभिनेत्री झिनल बेलाणीचा झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 18:20 IST
सेटवर एक्शन सीन्स करताना कलाकारांना दुखापत होत असते. खतरनाक स्टंट करत असताना कलाकारांना दुखापत होते आणि मग मालिकेचे शूटिंग ...
अभिनेत्री झिनल बेलाणीचा झाला अपघात
सेटवर एक्शन सीन्स करताना कलाकारांना दुखापत होत असते. खतरनाक स्टंट करत असताना कलाकारांना दुखापत होते आणि मग मालिकेचे शूटिंग लांबणीवर पडते. असाच काहीसा किस्सा 'हर मर्द का दर्द'च्या सेटवर घडला. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान झिनल जिन्यावरून घसरून पडल्याने चित्रीकरण काही काळ खोळंबले होते. या मालिकेत झिनल ही नायक विनोद खन्नाची (फैझल रशीद) पत्नी सोनू हिची भूमिका साकारीत आहे. मालिकेच्या भागाचे चित्रीकरण सुरू असताना अनवधानाने तिचा पाय जिन्यावरून सरकला आणि ती घसरून पडली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने मालिकेचे चित्रीकरण काही काळ खोळंबले होते. या घटनेबद्दल झिनलने सांगितले,“मालिकेच्या एका भागाचं चित्रीकरण जिन्याजवळच्या जागेत सुरू होतं. तेव्हा माझा पाय पायरीवरून घसरल्याने मी जिन्यावरून घसरले. पण मला इतका मार बसला असेल असं वाटलंच नाही; परंतु डॉक्टरांनी मला तीन दिवस सक्तीची विश्रांती घेण्यास सांगितली आहे. माझ्या गुडघ्याला खरचटलं असून मला तीन-चार दिवस कोणतंही शारीरिक कष्टाचं काम करण्यास मनाई करण्यात आली आहे.”तिची ही अवस्था लक्षात घेऊन निर्मात्यांनी तिच्याशिवायच चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला. ती जेव्हा पूर्ण बरी होईल, तेव्हाच तिला चित्रीकरणास उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. यावर झिनल म्हणाली,“मी हालचाल करण्याच्या स्थितीत नाही, हे पाहून निर्मात्यांनी मला पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला,हे पाहून मला खूपच छान वाटलं.सुदैवाने फार गंभीर अपघात झाला नसल्याने मी दोन-तीन दिवसांत पुन्ही चित्रीकरणास प्रारंभ करीन.”