Join us

'मला कल्पना नव्हती की..', 'तेरी मेरी डोरियां' मालिकेबाबत अभिनेत्री हिमांशी पराशरचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 18:27 IST

स्टारप्लसचा नवीन शो 'तेरी मेरी डोरियां' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्टारप्लसचा नवीन शो 'तेरी मेरी डोरियां' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार  आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझर्सनी प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली. तेरी मेरी डोरियां ही प्रेमकथा आहे ज्यात खूप ट्विस्ट आणि टर्नस आतहे. यात तीन जोडप्यांची गोष्ट दाखवण्यात आला आहे.

अलीकडेच 'तेरी मेरी डोरियां'मध्ये मुख्य भूमिकेत दिसणारी हिमांशी पराशरने म्हणाली, “मला लहानपणापासून टीव्ही कलाकार आवडायचे. मी माझ्या आईसोबत खूप टीव्ही शो पाहायचे पण मी कधीच विचार केला नव्हता की एक दिवस मी ही टीव्ही कलाकार होईन असा. तेरी मेरी डोरियांचा एक भाग बनून मला खूप आनंद होत आहे. जेव्हा मी वैद्यकीय अभ्यासात व्यस्त असलेल्या छोट्या हिमांशीचा विचार करतो तेव्हा मला खूप खूश होते.

ती पुढे म्हणाली, "मला कल्पना नव्हती की आयुष्याकडे मला देण्यासाठी खूप काही आहे. जेव्हा मी माझ्या टीममधल्या  कलाकारांसोबत शूट केलेल्या एपिसोडचं आऊट पूट बघते तेव्हा मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतं.  मी याआधी वेगवेगळ्या शोसाठी शूटिंग केले आहे पण तेरी मेरी डोरियांसाठी शूटिंग करणे हा एक पूर्णपणे वेगळा अनुभव होता ज्यामुळे तो खास बनतो.

 

टॅग्स :टिव्ही कलाकार