Join us

बबिताला टक्कर द्यायला येतेय 'ही' ग्लॅमरस अभिनेत्री, 'तारक मेहता..' मालिकेत नवीन सदस्याची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 11:04 IST

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत नवीन अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. या अभिनेत्रीच्या एन्ट्रीने मालिकेत रंजक वळण येणार आहे

टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ गेली १५ वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत दयाबेन कधी परतणार असा एकच प्रश्न चाहत्यांच्या मनात आहे. दयाबेन कधी परतणार याचं उत्तर तर माहिती नाही पण मालिकेत एका ग्लॅमरस अभिनेत्रीची एन्ट्री आहे. या अभिनेत्रीच्या एन्ट्रीने मालिकेत नवीन ट्विस्ट अँड टर्न निर्माण होणार आहेत. कोण आहे ही अभिनेत्री? ती कोणती भूमिका साकारणार? जाणून घ्या.

अन्वी तिवारीची मालिकेत नवी एन्ट्री

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत अभिनेत्री अन्वी तिवारीची एन्ट्री होणार आहे. अन्वी या मालिकेत ‘मोना’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.  मालिकेत पाहायला मिळतंय की, सध्या वर्मा जींच्या घरात रेनोवेशनचं काम सुरू आहे. हे घर नव्याने भाड्याने दिलं जाणार असल्याचं दाखवलं जात आहे आणि या नव्या भाडेकरूची भूमिका ‘मोना’ची असणार आहे, अशी चर्चा आहे. अद्याप निर्मात्यांनी अधिकृत घोषणा केलेली नसली, तरी मोनाच्या भूमिकेत अन्वीचा लूक आणि सेटवरील अपडेट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अन्वी तिवारीने यापूर्वी ‘विघ्नहर्ता गणेश’,  ‘दहेज दासी’, ‘जय जगन्नाथ’ यांसारख्या मालिकांमधून ओळख मिळवली आहे. तिचा अभिनय आणि ग्लॅमरस लूकमुळे ती प्रेक्षकांमध्ये आधीच लोकप्रिय आहे. अन्वीच्या आगमनामुळे मालिकेत एक नवीन वळण येणार असून प्रेक्षकांना नव्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत.  ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत दिलीप जोशी, मंदार चांदवडकर, सोनालिका जोशी या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. गेली १२ वर्षांहून जास्त वर्ष ही मालिका लोकांचं प्रेम मिळवत आहे. अन्वी तिवारीच्या एन्ट्रीने मालिकेत कशी रंगत निर्माण होणार, हे पाहावं लागेल

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनमंदार चांदवडकर