'विघ्नहर्ता गणेश' आणि 'बिग बॉस OTT 2' फेम अभिनेत्री आकांक्षा पुरीने (akanksha puri) तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. ३६ व्या वर्षी आकांक्षाने एग्ज फ्रीज केल्याचा मोठा खुलासा केला आहे. या निर्णयामध्ये आाकांक्षाच्या आईने तिला पूर्ण पाठिंबा दिला, असं तिने सांगितलं. आकांक्षाने हा खुलासा केल्याने सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना धक्का बसला आहेच. पण अनेकांनी आकांक्षाच्या निर्णयाचं कौतुकही केलं आहे.
आकांक्षाने घेतला धाडसी निर्णय
आकांक्षाने एका मुलाखतीत सांगितले की, "मी काही वर्षांपूर्वीच एग्ज फ्रीज करण्याचा निर्णय घेतला होता. अनेक अभिनेत्री हे करतात, पण समाजामध्ये टीका होईल या भीतीने त्याबद्दल त्या बोलत नाहीत. पण माझ्या आईने मला या निर्णयात पूर्ण पाठिंबा दिला. ती म्हणाली, 'तू आधुनिक काळात जन्मली आहेस, तुझ्याकडे हा पर्याय आहे, मग का नाही वापरायचा?'"
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आकांक्षाला अनेक शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागले. तिने सांगितले की, "या प्रक्रियेमुळे शरीरावर अनेक परिणाम होतात. मला अतिरिक्त इंजेक्शन्स घ्यावी लागली आणि मी काही काळासाठी व्यायाम थांबवला. या प्रक्रियेमुळे माझ्या शरीरात बदल झाले, पण सध्या मी या नवीन प्रवासाचा आनंद घेत आहे. तुम्ही तुमच्या आयुष्याचे नियंत्रण स्वतःच्या हाती घ्या. तुमच्याकडे पर्याय आहेत, त्यांचा योग्य वापर करा." आकांक्षा शेवटी म्हणाली, "सध्या तरी माझा लग्न करण्याचा कोणताच विचार नाही. लग्न झाल्यानंतर मुल होण्याविषयी विचार करायचा असेल तर तो मी नक्की करेन. किंवा मी सिंगल मदर म्हणूनही आनंदी राहील."