‘गुलाम’च्या मालिकेत होणार निधी झा या अभिनेत्रीची एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2017 12:54 IST
‘गुलाम’ या मालिकेच्या कथानकातील चढ-उतारांनी प्रेक्षकांमधील उत्कंठा चांगलीच वाढविली आहे.वीरने (विकास मानकताला) रंगीलाच्या (परमसिंह) निष्ठेविषयी शंका उपस्थित केल्यामुळे रंगीलाने ...
‘गुलाम’च्या मालिकेत होणार निधी झा या अभिनेत्रीची एंट्री
‘गुलाम’ या मालिकेच्या कथानकातील चढ-उतारांनी प्रेक्षकांमधील उत्कंठा चांगलीच वाढविली आहे.वीरने (विकास मानकताला) रंगीलाच्या (परमसिंह) निष्ठेविषयी शंका उपस्थित केल्यामुळे रंगीलाने आपली निष्ठा सिध्द करण्यासाठी विविध आव्हाने पेलली आहेत. बेरहमपूरमधील निर्दयीपणाचा अनुभव घेतल्यावर शिवानीला (नीती टेलर) अखेरीस स्वत:ची ओळख पटली आहे. सा-या अडचणी सोसून तिने आपण आपला पती रंगीला याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा दृढनिश्चय व्यक्त केला आहे.आता एका नव्या व्यक्तिरेखेच्या प्रवेशानंतर या मालिकेच्या कथानकाला नवी कलाटणी मिळणार आहे. अभिनेत्री निधी झा हिचा या मालिकेत प्रवेश होणार असून ती यात राधिका ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. राधिकेची मोटार खराब झाल्यामुळे ती बेरहमपूरमध्ये अडकून पडलेली असते आणि इथे तिचे कोणीच नातेवाईक नसतात. रंगीला तिची काही गुंडांच्या तावडीतून सुटका करतो आणि तिची मोटार दुरुस्त होईपर्यंत तिला आश्रय देतो. पण वीरला त्याच्या या योजनेचा सुगावा लागतो आणि तो त्याला शिक्षा देण्यासाठी राधिकेशी लग्न करण्याचा हुकूम सोडतो. “गुलामसारख्या चाकोरीबाहेरील मालिकेशी निगडित होण्याची मला संधी मिळाल्यामुळे मी स्वत:ला अतिशय सुदैवी समजते. या मालिकेने टीव्हीवरील मालिकांची चाकोरी मोडून काढली आहे. मला जेव्हा राधिकेची भूमिका समजावून सांगण्यात आली, त्याक्षणी मी या व्यक्तिरेखेच्या प्रेमात पडले आणि तिला तात्काळ होकार दिला. मी अशी भूमिका आजपर्यंत साकारलीच नसल्याने ही व्यक्तिरेखा रंगविण्यास मी खूपच उत्सुक बनले आहे,” असे निधी झाने सांगितले. निधीला तिच्या राधिकेच्या भूमिकेसाठी शुभेच्छा!