Join us

‘नजर’ मालिकेत अभिनेता सिकंदर खरबंदा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 08:00 IST

अमानवी शक्तीच्या संकल्पनेवर आधारित या मालिकेत टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता सिकंदर खरबंदा एका पाहुण्या कलकारच्या भूमिकेत दिसणार आहे.

अगदी वेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखा आणि कथानकाला मिळणार्‍्या अनपेक्षित कलाटण्यांमुळे ‘स्टार प्लस’वरील ‘नजर’ ही मालिका प्रेक्षकांना आश्चर्याचे धक्के देत असते. आता या मालिकेत एका अगदी नव्या व्यक्तिरेखेचा प्रवेश होणार असून तिच्या आगमनामुळे कथानकाला अनपेक्षित कलाटणी मिळेल. अमानवी शक्तीच्या संकल्पनेवर आधारित या मालिकेत टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेता सिकंदर खरबंदा एका पाहुण्या कलकारच्या भूमिकेत दिसणार आहे.

सिकंदर हा जिवंत प्रेतांचा (झोंबी) शोध घेऊन त्यांचा नाश करणा-या व्यक्तीच्या भूमिका साकारणार आहे. सिकंदर सांगतो, “अमानवी शक्तींच्या संकल्पनेवर आधारित नजरसारख्या मालिकेने टीव्हीच्या प्रेक्षकांमध्ये आपलं एक स्थान निर्माण केलं असून त्यात मला एक भूमिका रंगवायला मिळणार असल्यामुळे मी खूप आनंदात आहे. या मालिकेचं कथानक आणि त्यातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांचा श्वास रोधून धरणा-या आहेत. 

यातील रुद्राच्या भूमिकेसाठी माझ्याकडे विचारणा करण्यात आली, तेव्हा मला जाणवलं की मी आजवर साकारलेल्या कोणत्याही भूमिकेपेक्षा ही अगदी वेगळी भूमिका असेल. मी ही अगदी तन्मयतेने ही भूमिका उभी करण्याचा निश्चय केला. रुद्रा हा झोंबींचा नाशक असून तो वेताळ मिताकिसच्या प्रभावाखालून राठोड कुटुंबियांची सुटका करणार असतो. पूर्वी त्याच्याच कुटुंबांवर या झोंबींनी हल्ला केलेला असतो; त्यामुळे त्यांचा नाश कसा करायचा, हे त्याला  चांगलेच माहिती असते. या भूमिकेचा प्रवास त्यांनी ज्याप्रकारे आखला आहे, ती गोष्ट मला फार आवडली. याशिवाय या भूमिकेतून मला बरेच थराररक आणि अ‍ॅक्शन प्रसंग साकारावे लागणार होते, त्याचंही मला आकर्षण वाटलं. म्हणूनच ही भूमिका साकारताना मला जितका आनंद झाला, तसाच तो ती पाहतानाही प्रेक्षकांना होईल, अशी आशा करतो.”

‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी जिंदगी के’ आणि इतर मालिकांमध्ये त्याच्या भूमिकांमुळे तसेच 'टारझन- द वंडर कार',' कुछ तो है'  आणि इतर हिंदी चित्रपटांतील भूमिकांमुळे सिकंदर लोकप्रिय बनला. त्याने आजवर 20 पेक्षा अधिक भोजपुरी चित्रपटांतून भूमिका  साकारल्या असून आता तो साचेबद्ध भूमिका नाकारत एक वेगळ्याच भूमिकेच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येणर आहे.