अभिनेता परमसिंहने उघड केले हे रहस्य?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2017 14:28 IST
परमसिंह हा अभिनेता ‘गुलाम’मधील आपली व्यक्तिरेखा साकारत असल्यामुळे आज मै उपर आसमाँ निचे अशीच काहीशी आनंदात परमसिंह दिसतोय. या ...
अभिनेता परमसिंहने उघड केले हे रहस्य?
परमसिंह हा अभिनेता ‘गुलाम’मधील आपली व्यक्तिरेखा साकारत असल्यामुळे आज मै उपर आसमाँ निचे अशीच काहीशी आनंदात परमसिंह दिसतोय. या मालिकेत तो 'रंगीला' ही व्यक्तिरेखा साकारत आहे. त्याची व्यक्तिरेखा खलप्रवृत्तीची असली, तरी हळूहळू ती नायकाच्या भूमिकेकडे त्याचा कल वाढतोय.या भूमिकेसाठी त्याची निवड झाल्यापासून परमसिंहने अजिबात सुटी घेतलेली नसून तो ही व्यक्तिरेखा रंगवण्यासाठी पुरेपुर मेहनत घेत आहे.“रोज सकाळी उठल्यावर मी मेकअप करण्याची, माझे संवाद पाठ करण्याची आणि कॅमेर््यासमोर उभा राहण्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असतो. रोजचा शेड्युअलचा मला कंटाळा येत नसून हेच ते क्षण आहेत ज्यात मी स्वत:ला एक अभिनेता म्हणून सिध्द करू शकतो. माझ्या कॅरेक्टर मला खूप प्रिय आहे.ब-याचवेळा माझे मित्रही म्हणतात कॅरेक्टरमधून बाहेर पड प्रत्येक क्षणी रंगीला आता .याची आठवण करून देत असतात असे परमसिंहने सांगितले.परमसिंहबाबतची आणखी एक गोष्ट फारच थोड्य़ांना माहिती असावी.ती म्हणजे तो सोशल मीडियापासून चार हात लांबच असतो.‘फेसबुक’ किंवा ‘इन्स्टाग्राम’ सोडाच, पण अगदी ‘व्हॉटसअॅप’वरसुध्दा त्याचे अकाउंट नाहीय! आजच्या काळातील तरुण अभिनेते-अभिनेत्री सोशल मीडियावरील आयुष्यच अधिक महत्त्वाचे वाटते.परमसिंहला मात्र या गोष्टीपासून लांबच राहायला आवडते. त्याच्या या सवयीबद्दल विचारले असता परमसिंह म्हणाला,मला जास्तीत जास्त काम करायला आवडतं आणि सोशल मीडियावर सेल्फी काढणा-या चाहत्यांपेक्षा मला या कामाच्या माध्यमातूनच स्वत:चा चाहतावर्ग तयार करायचा आहे. म्हणूनच तुम्हाला मी फेसबुक, इन्स्टाग्राम किंवा व्हॉटस अॅपवर दिसणार नाही. मी ट्विटरवर आहे, पण माझी मालिका आणि माझ्या व्यक्तिरेखेची माहिती देण्यापुरता. त्यावर मी दुसरं तिसरं काही पोस्ट करत नाही.”परमला प्रारंभापासूनच अभिनेता व्हायचं होतं आणि त्याच्याकडे बॅरी जॉन यांच्या अभिनयशाळेची पदवी देखील आहे.