'आई कुठे काय करते' मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेच्या कथानकाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळते आहे. या मालिकेतील सर्वच प्रमुख पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील एका अभिनेत्याने मालिका सोडली असल्याची चर्चा आहे. हा अभिनेता म्हणजे या मालिकेतील देशमुख कुटुंबाचे जावईची भूमिका साकारणारा अभिनेता आशिष कुलकर्णी.
आई कुठे काय करते मालिकेत केदारच्या भूमिकेतून अभिनेता आशिष कुलकर्णी घराघरात पोहचला. त्याने साकारलेल्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. दरम्यान आता अशी चर्चा ऐकायला मिळते आहे की, त्याने ही मालिका सोडली आहे. तो सोनी मराठी वाहिनीवरील तुमची मुलगी काय करते मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. त्यामुळे त्याने ही मालिका सोडल्याची चर्चा रंगली आहे. मात्र या वृत्ताला अद्याप त्याच्याकडून दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे येत्या काळात कळेल की, आशिष कुलकर्णीने आई कुठे काय करते मालिकेत काम करतोय की नाही.