हा अभिनेता धावून गेला एका वृद्ध व्यक्तीच्या मदतीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 12:57 IST
ब-याचदा डोळ्यासमोर काही चुकीच्या गोष्टी घडत असताना बाकी लोक मात्र बघ्याची भूमिका घेत असतात. अशी अनेक प्रकरणं आहेत ज्यात ...
हा अभिनेता धावून गेला एका वृद्ध व्यक्तीच्या मदतीला
ब-याचदा डोळ्यासमोर काही चुकीच्या गोष्टी घडत असताना बाकी लोक मात्र बघ्याची भूमिका घेत असतात. अशी अनेक प्रकरणं आहेत ज्यात लोक गर्दी करून त्याचे मोबाईल शूट करतात मात्र त्यावेळी मदत करण्यासाठी लांबच राहतात. असाच काहीसा किस्सा घडला अभिनेता परम सिंह बरोबर मात्र यावेळी त्याने न घाबरता गरजूची मदत केली होय,नुकतेच एका वृद्ध मनुष्य आणि त्याच्या नातीच्या मदतीसाठी परम धावून गेला.चित्रीकरणासाठी जाताना परम सिंगला दिसले की काही गुंड एका वृद्ध मनुष्य आणि त्याच्या नातीला त्रास देत आहेत,तेव्हा परमने या गोष्टीत हस्तक्षेप करत त्या दोघांनाही गुंडांपासून वाचवले.परिस्थिती हाताबाहेरच जाणार होती की तिथे जमलेल्या बघ्यांनी मध्यस्थी करून प्रकरण शांत केले. परमने आपल्या शो च्या सेटवर जाण्याआधी त्या दोघांना घरीही सोडले.या प्रसंगाबाबत परम म्हणाला, “मी चित्रीकरणासाठी सेटवर जात असताना एका वृद्ध मनुष्य आणि त्याच्या नातीवर भर रस्त्यात गुंडांनी हल्ला केल्याचे पाहून मला धक्काच बसला आणि त्यांच्या मदतीसाठी कोणीही काहीही केले नाही. मी त्यांच्या मदतीसाठी धावून गेलो आणि त्यांना घरी सुरक्षितपणे पोहोचवले.वृद्धांचा आदर करून त्यांची काळजी घेतली गेली पाहिजे. जर माझ्या डोळ्यांसमोर काही चुकीचे घडत असेल तर मी त्याकडे निश्चितपणे दुर्लक्ष न करता त्याविरोधात लढेन.”इतरांनीही कधीही कोणाला गरज असेन तर त्वरित त्यांची मदत करा, मोबाईल शूट करत बसण्यापेक्षा मदत करा त्यांचे आशिर्वादच पुढे तुमच्या कामी येतील हा तरी विचार करा आणि मदतीसाठी आपले हात पुढे करा असा मोलाचा सल्लाही परमने यावेळी सगळ्यांना दिला आहे.परम सिंह गुलाम मालिकेत 'रंगीला' या खलनायकाची भूमिका साकारत आहे.