Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘बिट्टी बिझनेसवाली’मध्ये अभिनेता अभिषेक बजाज बनला दबंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2018 17:02 IST

'बिट्टी बिझनेसवाली' हा नवीन कोरा शो रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.उत्तर प्रदेशमध्ये घडणारी ही कथा आहे ‘स्वाभिमान कमानेवाली’ ...

'बिट्टी बिझनेसवाली' हा नवीन कोरा शो रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.उत्तर प्रदेशमध्ये घडणारी ही कथा आहे ‘स्वाभिमान कमानेवाली’ किंवा सोप्या शब्दांत सांगायचे झाले तर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन आत्मसन्मान मिळवणाऱ्या एका पात्रा भोवती फिरते. माही - मालिकेतील मध्यवर्ती पुरुषाची ही महत्वाची भूमिका साकारण्यासाठी निर्मात्यांनी अभिषेक बजाज ह्या टेलीव्हिजनच्या लोकप्रिय अभिनेत्याला सामील करून घेतले आहे.या आधी त्यांने 'संतोषी माँ' ह्या प्रसिद्ध टीव्ही मालिकेत काम केले होते. माहीच्या स्वतःच्या अशा वेगवेगळ्या छटा आहेत.वाळू कंत्राटदार म्हणून काम करताना त्याने आपल्या वडिलांकडून व्यापाराची सूत्रे शिकली आणि आपले काम काढून घेण्यासाठी तो काहीसा आक्रमक व दबंग बनत गेला. असे असले तरी तो एक संवेदनशील माणूस आहे.त्याला मोठ्यांविषयी आदर आहे आणि त्याला विनोदाची चांगली जाणसुद्धा आहे. त्याच्या छोट्या छोट्या वाक्यांमधून ते नेहमी जाणवते. बिट्टीला भेटण्यासाठी तो काय काय करतो हे पाहणे मजेशीर आहे. अभिषेकला, तो ‘बिट्टी बिझनेसवाली’ चा एक भाग असण्याबद्दल काय वाटते असे विचारल्यावर हा हुशार अभिनेता म्हणाला, “ छोट्या पडद्यावर पुन्हा पदार्पण करणे आणि ‘बिट्टी बिझनेसवाली’चा भाग बनण्याची संधी मिळणे हे खरंच खूप आनंदाचे आहे. ही अशी गोष्ट आहे जी सांगितलीच गेली पाहिजे. आपल्या देशातल्या प्रत्येक स्त्री व पुरुषाने ती गोष्ट ऐकलीच पाहिजे. महिला सबलीकरणाबद्दल आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याविषयी भारत ज्या पद्धतीने विचार करतो, त्यात बदल घडवून आणण्यास प्रोत्साहन देणे हा इथे खरा हेतू आहे. मी ज्या टीमसोबत काम करतोय ती खरंच खूप उत्तम आहे. शोच्या आशयाला घेऊन “प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत” त्या पाहण्यासाठी मी आतुर झालोय.”