अभिनेता आशय कुलकर्णी मराठी कलाविश्वातील आणि टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा आहे. त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेता त्यांच्या संपर्कात असतो. आपले फोटो, व्हिडीओ आणि आगामी प्रोजेक्टबाबतची माहिती तो चाहत्यांना देत असतो. लोकमत फिल्मीशी बोलताना आशयने त्याच्या बालपणीचा एक भन्नाट किस्सा सांगितला आहे.
आशय म्हणाला, लहान असताना मी कुत्र्याचं पिल्लू समजून डुकराचं पिल्लू घरी घेऊन आलो होतो. डुकराचं पिल्लू बाल्कनीत ठेवून त्याला बिस्कीट वगैरे खाऊ घातलं होतं. रात्री बाबा आले बाहेर गावावरुन त्याना आवाज ऐकू आला. त्यांना वाटलं उंदीर आहे का घरात बेडखाली वैगर बघितलं पण नव्हता म्हणून त्यांनी गॅलरीचं दार उघडलं. डुकराचं पिल्लू बावचळलेले होतं आत ठेवलं म्हणून आणि रात्री ते घरात सुटलं. सगळीकडे पळायला लागलं, देवघरात जाऊन त्याने सगळं देव पाडले. मी त्यावेळी झोपलो होतो मला हे सगळं चालंय हे माहिती नव्हतं. मला झोपेतून उठवलं आणि थेट मारायला सुरुवात केली. मला कळतं नव्हतं की मला का मारतायेत. मी आईला बाबा मारतायेत म्हणून सांगू लागलो. आईलाही कळेना बाबा का मारतायेत ते. खूप मार खाल्ला आणि त्यांनतर मी परत कधी कोणतंच पिल्लू घरी आणलं नाही.
आशय कुलकर्णी छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. माझा होशील ना, सुंदरी, पाहिले न मी तुला या मालिकेत तो झळकला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने प्रेयसी सानिया गोडबोलेशी लग्नगाठी बांधली आहे. कोकणातील दापोलीत हा संपूर्ण सोहळा रंगला होता. दरम्यान आशय आणि सानिया गेले अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. सानिया ही अभिनेत्री नाही तर शास्त्रीय नृत्यांगना आहे. अनेक प्रकारचे डान्स फॉर्म्स तिला येतात. शिवाय ती नृत्य शिकवते सुद्धा.