Join us

कॉमेडीयन सुनील ग्रोव्हरवर फसवणूक केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2017 14:28 IST

कॉमेडीयन कपिल शर्मासह सुनील ग्रोव्हरचे झालेल्या वादानंतर सुनिल ग्रोव्हर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.यावेळी कोणत्याही वादाचे कारण नसून खुद्द ...

कॉमेडीयन कपिल शर्मासह सुनील ग्रोव्हरचे झालेल्या वादानंतर सुनिल ग्रोव्हर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.यावेळी कोणत्याही वादाचे कारण नसून खुद्द सुनिल ग्रोव्हरने एका  कार्यक्रम आयोजकाची फसणूक केल्याची माहिती समोर येत आहे. एका कंपनीच्या माध्यमातून सुनिल ग्रोव्हर वेगेवगळ्या शहरांमध्ये लाईव्ह शो करत असतो.सुनिल ग्रोव्हर करत असलेल्या शोला रसिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.त्यानुसार येत्या 27 मेला सुनिल ग्रोव्हर अहमदाबादमध्ये शो करणार होता.मात्र आता हा शो वादाच्या भोव-यात अडकणार असेच दिसतंय.अहमदाबादमध्ये राजपाल नावाच्या व्यक्तिने सुनिल ग्रोव्हसह एव्हेंट कंपनीलाही कोर्टात खेचल्याची माहिती मिळतेय.27 मेला हा शो होणार असल्याचे कॉट्रॅक्टमध्ये लिहीण्यात आले होते.ऐनवेळी सुनिलने हा शो करण्यास नकार दिल्याने राजपालने कंपनीसह सुनिल ग्रोव्हरला कोर्टात खेचले आहे.राजपाल याने सांगितले की, सुनिलला दुस-या ठिकाणी जास्त पैसे मिळणार आहे त्यामुळे त्याने 27 मेला अहमदाबादमध्ये पूर्वनियोजित शो रद्द केला आहे. सुनिलच्या टीमकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण आलेले नसून यांवर काहीही बोलण्यास त्याने नकार दिला आहे.राजपालने आईपीसी कलम 417 आणि120 नुसार त्याची फसवणूक झाले असल्याच्या आरोपाअंतर्गत केस दाखल केली आहे.कोर्टानेही स्थानिक पुलिस स्टेशनला याप्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.याविषयी सुनिल ग्रोव्हर काहीही स्पष्टीकरण दिले नसले तरी  एव्हेंट कंपनीचा मॅनेजर देवांग शहाने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की,आम्ही कोणत्याही प्रकारे राजपाल यांची फसवणूक केलेली नाहीय.अहमदाबाद मध्ये 27 मेला शो होणार होता  त्यानुसार आम्हाला शोचे अॅडव्हान्स बुकिंगचे 10 लाख देण्यात आले होते.मात्र शो होणार नाही असे समजात आम्ही राजपाल यांना त्यांचे पैसेही परत दिले आहेत.27मे दरम्यान सुनिल ग्रोव्हर बिझी असणार आहे. त्यामुळे तो हा शो करू शकणार नाहीय.माझ्याकडे पुरावा म्हणून सगळ्या बँकेचे कागदपत्रे आहेत. त्यावरून आम्ही कोणाचेही पैसे ठेवलेले नाहीत याविषयीचा तो एक पुरावा आहे.