स्टार प्लसवरील शो इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार्सने आपल्या ताज्या नवीन कॉन्टेन्टसह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि आता स्पर्धक आपल्या प्रदर्शनाला पुढच्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी दररोज सुपरस्टार्स की पाठशाला ह्या ॲकॅडमीमध्ये मेहनत घेत आहेत. ह्या शोमधील स्पर्धकांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना प्रभावित केले आहे पण अव्वल दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्यांना त्यांच्या संवादफेकीवर काम करण्यास सांगितले. ह्या गोलमाल दिग्दर्शकाने स्पर्धकांना त्यांच्या डिक्शनवर काम करायला सांगितले आणि आपले संवाद व आवाजावर प्रभुत्व मिळवण्यासाठी दररोज करण्यासारखे काही व्यायाम सांगितले. रोहितने हेही नमूद केले की त्याने अजय देवगण आणि हृतिक रोशन यांना ह्या एक्सरसाईज, योगा वगैरे डिक्शन आणि डायलॉग डिलिव्हरीसाठी करताना पाहिले आहे. अर्थातच, स्पर्धकांनी लगेचच त्यांच्या ह्या सूचनेवर अंमल केला.
या शोमध्ये आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनासाठी राणी मुखर्जी देखील आली होती. मिळालेल्या माहिती नुसार राणीसुद्धा या शोमध्ये जायला उत्सुक होती. २०१३ मध्ये आलेल्या बॉम्बे टॉकीज चित्रपटानंतर करण आणि राणीच्या तब्बल 5 वर्षांनी एकत्र दिसणार होते. राणी एपिसोडच्या शूटसाठी लोकेशनवर पोहोचली सुद्धा मात्र अचनाक तिची तब्येत बिघडली. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार ज्यावेळी राणी इंडियाज नेक्स सुपरस्टारच्या मंचावर शूटिंगसाठी तयार होत होती त्यावेळी अचानक तिचे पाठिचे दुखणे सुरु झाले. पाठिचे दुखणे ऐवढे वाढले की शूट केल्याशिवायच ती तिथून निघून गेली. त्यानंतर तिला डॉक्टरांना दाखवण्यात आले.
गेल्या तीन दिवसांपासून राणीला पाठीचा दुखणे त्रास देते. तरी ही तिने शूटिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र अचानक दुखणे वाढल्याने तिला शूटिंग पूर्ण करता आली नाही. राणी गेल्या अनेक वर्षांपासून स्क्रिनपासून दूर होती. यशराज बॅनरच्या चित्रपटातून ती कमबॅकसाठी तयार आहे. राणी आपल्या या चित्रपटाला घेऊन खूपच एक्साईडेट हिचकी चित्रपटात राणी मुखर्जी नैना माथूर नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. नैनाला टॉरेट सिंड्रोमने नावाच्या आजाराने ग्रासलेले असते. त्यामुळी ती बोलताना अडखळते आणि एकच वाक्य दोन वेळा बोलते.
अजय देवगणप्रमाणे या गोष्टीवर मेहनत करण्याचा सल्ला रोहितने स्पर्धकांना दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 14:38 IST