Join us

"मला अभिनयही करायचा आहे...", अभिजीत सावंतने व्यक्त केली इच्छा, बिग बॉसनंतर पुन्हा मिळाली प्रसिद्धी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 13:10 IST

आयुष्यात आर्थिक स्थिरता ही कधीच... अभिजीत स्पष्टच बोलला

'इंडियन आयडॉल' या लोकप्रिय शोच्या पहिल्याच सीझनचा विजेता हा मराठमोळा होता. गायक अभिजीत सावंतने (Abhijeet Sawant) हा किताब पटकावला होता. अभिजीत पहिला 'इंडियन आयडॉल' ठरला आणि रातोरात स्टार झाला. नंतर त्याने अनेक लोकप्रिय गाणी गायली. मात्र हळूहळू तो प्रसिद्धीझोतापासून दूर गेला. काही वादांमध्येही अडकला.  त्याची लोकप्रियता कमी झाली. यंदा बिग बॉस मराठी ५ मुळे तो पुन्हा लाईमलाईटमध्ये आला. 

बिग बॉस नंतर आयुष्य कसं बदललं आणि यापुढे काय काय करायची इच्छा आहे यावर अभिजीत सावंतने उत्तर दिलं आहे. 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत म्हणाला, "बिग बॉसनंतर आयुष्य बदललं. आता गोष्टी माझ्या हातात आल्या आहेत. आत्मविश्वास आला आहे. पैसे कमवणं किंवा आर्थिकदृट्या आयुष्य सुरक्षित करणं ही कधीच माझ्यासमोर अडचण नव्हती. पण याआधी आपलं काम लोकांना दाखवणं हे खूप कठीण होतं जे आता सोपं झालं आहे. ही प्रक्रिया आहे जी चालतच राहणार आहे."

तो पुढे म्हणाला, "माझी अजून अनेक स्वप्न आहेत जे  पूर्ण व्हायचे आहेत. मला अभिनयही करायचा आहे. मराठी सिनेमा करायचा आहे. संगीत क्षेत्रात मला अनेक बड्या कलाकारांसाठी गायचं आहे. तसंच आयुष्यात आता एवढा काळ गेला आहे की आता भविष्यातले ध्येय इतके महत्नाचे राहत नाहीत. त्यामुळे आता जे हातात आहे ते किती चांगलं करु शकतो त्यातच जास्त आनंद मिळायला लागला आहे."

'बिग बॉस'मधून बाहेर येताच त्याच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली. त्यामुळे अभिजीतबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षकांना उत्सुक असतात. आता अभिजितला नवीन प्रोजेक्टमध्ये पाहण्यासाठी आणि त्याची गाणी ऐकण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :अभिजीत सावंतबिग बॉस मराठीसंगीत