Join us

'बिग बॉस मराठी 2': अभिजीत बिचुकले घरात करणार ही गोष्ट, वाचून तुम्हाला ही आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 13:36 IST

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असणाऱ्या शाळा सुटली पाटी फुटली या कार्यामध्ये सदस्य विद्यार्थी बनून बराच दंगा घालत आहेत

ठळक मुद्देक्लास घरामध्ये विशेष गमतीशीर असणार आहे

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरु असणाऱ्या शाळा सुटली पाटी फुटली या कार्यामध्ये सदस्य विद्यार्थी बनून बराच दंगा घालत आहेत. आज प्रेम शास्त्राबरोबर संगीत आणि इंग्लिशचे क्लास देखील घरामध्ये भरणार आहेत... संगीताचा तास वैशाली म्हाडे तर इंग्लिशचा अभिजीत बिचुकले घेणार आहेत... सदस्य या क्लासमध्ये देखील बरीच धम्माल मस्ती करतील यात शंका नाही.

 कुठल्याही प्रश्नाचे उत्तर सरळ देतील ते विद्यार्थी कुठले आणि हे तर बिग बॉसच्या घरातील सदस्य... वैशालीने विद्यार्थीना जेव्हा विचारले संगीत म्हणजे काय ? तेव्हा विद्याधर जोशी म्हणाले “संगीता”बद्दल मला नाही माहिती... संगीताबद्दल नाही तर गाण्याबद्दल बोलणे सुरु आहे असे वैशालीने सांगितले.

शेवटी सदस्यांच्या उत्तरांना आणि कल्ल्याला त्रस्त होऊन वैशालीने सांगितले गाण म्हणणे, नाच करणे आणि एखाद वाद्य वाजवणे या तीन गोष्टींचा जिथे संगम होतो त्याला संगीत म्हणतात... यावर देखील दिंगबर नाईक यांचे उत्तर फारच गंमतीदार होते “मला वाटल लग्नाच्या आदल्या दिवशी जो कार्यक्रम होतो त्याला संगीत म्हणतात”.

  BB विद्यालयमध्ये अभिजीत बिचुकले यांचा इंग्लिशचा तास देखील रंगणार आहे... हा क्लास घरामध्ये विशेष गमतीशीर असणार आहे... पराग आणि विणाने या क्लास मध्ये बिचुकले यांच्यासोबत बरीच धम्माल केली... बिचुकलेंचा इंग्लिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न पूर्णपणे दिसून येणार आहे... बिग बॉस यांनी सदस्यांवर हे कार्य सोपवून घरामध्ये वेगळीच गंमत आणली आहे... आज कोण नापास होईल ? कोण कॅप्टनसीच्या टास्क मधून बेदखल होईल कळेलच..

टॅग्स :बिग बॉस मराठी