टेलिव्हिजनवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte ) ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. सध्या मालिका उत्कंठावर्धक वळणावर आहे. नुकतेच मालिकेत आशुतोषने देशमुख कुटुंबासमोर अरुंधतीवरील प्रेमाची कबुली दिली. त्यावेळी तिथे कांचन आई, संजना, अनिरुद्ध, अनघा, अविनाश आणि अभिषेक उपस्थित होते. या नवीन ट्वीस्टमुळे मालिकेत काय घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे. दरम्यान आता सोशल मीडियावर मालिकेचा शेवट कसा होणार याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. यासाठी अरुंधतीचे सासरे आप्पा पुढाकर घेऊन त्या दोघांचे लग्न लावून देणार असल्याची चर्चा रंगली आहे.
आई कुठे काय करते ही मालिका सध्या यशाच्या शिखरावर आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार कायम चर्चेत असतो.मालिकेत अरुंधतीच्या नणंदेची आणि अनिरुद्धच्या बहिणीची भूमिका साकारणारी विशाखा खऱ्या आयुष्यात खूपच ग्लॅमरस आहे.